मुंबई - Ayushmann Khurrana : लोकसभा निवडणूक 2024 सुरू होण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात होणार असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी होईल. यानंतर 4 जून रोजी निकाल येईल. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील नवीन उमेदवार कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढवणार आहे. ती लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येईल की नाही हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे. दरम्यान बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना देशाच्या नवीन संसद भवनात पोहोचला होता.
आयुष्मान खुराना नवीन संसदेत : आयुष्मान खुरानानं निवडणुका सुरू होण्याच्या तीन दिवस आधी नवीन संसदेतील त्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यानं त्याचे फोटो शेअर करत पोस्टवर लिहिलं, 'नवीन संसद भवनात आल्यानं मला खूप चांगलं वाटलं, आपल्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी ही भव्य इमारत पाहिल्यानंतर मला अभिमान वाटतो, यात आपला वारसा, संस्कृती आणि सन्मान आहे, जय हिंद.' आता आयुष्माननं शेअर केलेल्या पोस्टवर त्याला त्याचे चाहते अनेक प्रश्न विचारत आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "आयुष्मान तू पण निवडणुकीत उभा असणार आहे का ? असेल तर कुठल्या पक्षाकडून आहेस." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "तू माझा आवडता अभिनेता आहे, पण खऱ्याकडून साथ देशील." आणखी एकानं लिहिलं, "नायक'च्या दुसऱ्या भागात हाच असणार." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
आयुष्मान खुरानाची निवडणूक आयोगानं केली निवड : तरुणांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोगानं आयुष्मान खुरानाची नुकतीच निवड केली होती. यापूर्वी, तो पत्नी ताहिरा कश्यपबरोबर प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसला होता. तसेच त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी तो 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री अनन्या पांडे ही प्रमुख भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. ता पुढं तो अमित शर्माच्या 'बधाई हो' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
हेही वाचा :
- 'क्रू'च्या निर्मात्यांनी दिली प्रेक्षकांना बेस्ट ऑफर, आता पाहा 150 रुपयांमध्ये चित्रपट - crew zing offer
- भूषण मंजुळे स्टारर 'रीलस्टार'च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू! - Bhushan Manjule
- राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - rajkummar rao and janhvi kapoor