ETV Bharat / entertainment

आयुष्मान खुरानाला पत्नी ताहिरा कश्यपनं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट व्हायरल - ayushmann khurrana birthday - AYUSHMANN KHURRANA BIRTHDAY

Ayushmann Khurrana birthday : आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनं त्याला आज वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. आता तिची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Ayushmann Khurrana
आयुष्मान खुराना (आयुष्मान खुराना (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2024, 5:00 PM IST

मुंबई Ayushmann Khurrana Happy : बॉलिवूडचा विकी डोनर आयुष्मान खुराना आज 14 सप्टेंबर रोजी त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी आयुष्मानला त्याची पत्नी ताहिरा कश्यपनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्मानला शुभेच्छा देताना ताहिरानं दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आयुष्मान आणि ताहिरामध्ये केमिस्ट्री असल्याचं दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या पतीशी संबंधित तिनं काही आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. ताहिरानं आयुष्मानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिलं आहे की, "आमचं प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम राहो, माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा." ताहिरानं सांगितलं की, तिनं शेअर केलेला दुसरा फोटो 2008 मधील तिच्या मुंबईतील पहिल्या घराचा आहे.

ताहिरा कश्यपनं आयुष्मान खुरानाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : एकता कपूरसह अनेक स्टार्सनी ताहिरा कश्यपची पोस्ट लाईक केली आहे. करण जोहरच्या धर्मा फिल्म प्रॉडक्शन हाऊससह अनेक स्टार्सनी आयुष्माला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय ताहिराच्या पोस्टवर अनेक चाहते आयुष्मानला वाढदिवसच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरासाठी हा दिवस खूप खास आहे. ताहिरा अनेकदा आपल्या पतीच्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

आयुष्यमानचे आगामी चित्रपट : आयुष्मान खुराना हा 25 ऑगस्ट 2023 रोजी कॉमेडी ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2 'मध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला होता. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अनन्या पांडे, विजय राज, मनजोत सिंग, अनुषा मिश्रा, सीमा पाहवा, अन्नू कपूर, रंजन राज, अभिषेक बॅनर्जी, परेश रावल आणि इतर कलाकार दिसले होते. आता पुढं तो 'बधाई हो 2' आणि 'वैम्पायर्स ऑफ विजय नगर' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. 'वैम्पायर्स ऑफ विजय नगर' या हॉरर कॉमेडी चित्रपटात तो पहिल्यांदा साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणी आयुष्मान खुरानानं ऐकवली भावनिक कविता, पाहा व्हिडिओ - Murder Case Ayushmann Khurrana
  2. मेघना गुलजारच्या चित्रपटापाठोपाठ आयुष्मान खुराना सनी देओलच्या चित्रपटातून पडला बाहेर - Ayushmann Khurrana
  3. आयुष्मान खुरानानं करीना कपूर स्टारर मेघना गुलजारचा चित्रपट नाकारला, आलं कारण समोर - Ayushmann and Meghna Gulzar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.