ETV Bharat / entertainment

आशिष विद्यार्थीनं घेतला डॉलीच्या टपरीवरील जगप्रसिद्ध चहाचा स्वाद, व्हिडिओ व्हायरल - Ashish Vidyarthi - ASHISH VIDYARTHI

Dolly Chaiwala : डॉली चायवालानं आता हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीचा खलनायक आशिष विद्यार्थीला चहा पाजला आहे. डॉलीचा चहा पिल्यानंतर आशिषनं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Dolly Chaiwala
डॉली चायवाला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 1:49 PM IST

मुंबई - Dolly Chaiwala : डॉली चायवाला याला आज अनेकजण ओळखतात. त्यानं स्वतःच्या प्रसिद्ध शैलीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्ससाठी चहा बनवला होता. यानंतर डॉलीचा चहा जगभर प्रसिद्ध झाला. डॉली चायवालाच्या टपरीवर प्रसिद्ध व्यक्तींच्या रांगा लागत असतात. त्याच्या टपरीवर अनेक सेलिब्रिटी चहा पिण्यासाठी येत आहेत. आता साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता डॉलीच्या टपरीवर चहा प्यायला आले होते. फूड व्लॉगर आणि अभिनेता आशिष विद्यार्थी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि त्यांनी नागपूरला डॉलीच्या टपरीवर चहा पिण्यासाठी हजेरी लावली.. काळ्या शर्टमध्ये आलेलो आशिष विद्यार्थी हे त्यांच्या टीमबरोबर होते.

आशिष विद्यार्थीला डॉलीचा चहा आवडला : आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आशिष विद्यार्थी प्रथम डॉली चायवालाला म्हणतात की ''भाऊ, तुझी हेअरस्टाईल मला अप्रतिम वाटत आहे. यानंतर चहाचे पाणी उकळते, ज्यावर अभिनेता म्हणतो की चहा सुंदर दिसत आहे. यानंतर डॉली चायवाला म्हणतो, ''हा चहा नाही पाणी उकळत आहे.'' आशिष विद्यार्थ्या डॉलीला विचारतात, ''तुम्ही किती दिवसांपासून चहा विकत आहात, तेव्हा डॉली चायवाला म्हणाली, आम्ही येथे 20 ते 25 वर्षांपासून चहा विकतो, पूर्वी माझा मोठा भाऊ हे दुकान सांभाळत होता, आता मी सांभाळत आहे.'' यानंतर आशिष विद्यार्थी डॉली चायवालाचा चहा पितात आणि ते अप्रतिम असल्याचं म्हणून त्याचं कौतुक करतात.

डॉली चायवाल्याचे 2 मिलियन फॉलोअर्स : डॉली चायवाला आता जगप्रसिद्ध चायवाला बनला आहे. याआधी त्याच्या टपरीवर बिग बॉस फेम तहलका भाई आला होता. तहलकानं त्याच्या पेजवर डॉलीचा चहा बनवतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याशिवाय डॉली हा काही दिवसांपूर्वी मालदीवला गेला होता. तो यावेळी सलमान खानचा भाऊ सोहेल खानला भेटला होता. यानंतर अनेकजण डॉली नक्की बिग बॉसमध्ये जाणार असल्याचा अंदाजा लावू लागले होते. डॉली चायवालाला इंस्टाग्रामवर 2 मिलियन लोक फॉलो करतात. जेव्हापासून बिग गेट्स त्याच्या टपरीवर चहा प्यायला आले, तेव्हापासून त्याच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा :

  1. 'मैदान' चित्रपटाला सेन्सॉरचा हिरवा कंदील, 'यूए' प्रमाणपत्रासह रिलीजचं मैदान मोकळं - maidaan Movie
  2. रणजीत यांनाही ऑफर झाली होती 'शोले'च्या गब्बरची भूमिका, मित्रासाठी दिला होता नकार - Sholay Gabbar Singh role
  3. 'चंदू चॅम्पियन'साठी कार्तिक आर्यननं घेतली कठोर मेहनत, 14 महिने गिरवले मराठीचे धडे - KARTIK AARYAN

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.