ETV Bharat / entertainment

बिग बॉस ओटीटीमध्ये राडा, विशाल पांडेच्या 'त्या' शब्दामुळे अरमाननं मारली झापड - Bigg Boss ott 3 - BIGG BOSS OTT 3

Bigg Boss OTT 3 : अरमान मलिकनं बिग बॉस ओटीटी 3मध्ये कृतिका मलिकवर केलेल्या कमेंटमुळे विशाल पांडेला झापड मारली आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात विशाल आणि अरमानमध्ये भांडण होताना दिसत आहे.

Bigg Boss OTT 3
बिग बॉस ओटीटी 3 (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 12:07 PM IST

मुंबई - Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरात एक धक्कादायक घटना घडली आहे. युट्युबर अरमान मलिकनं विशाल पांडेला झापड मारल्यानंतर तो चर्चेत आला आहे. 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये, माजी स्पर्धक आणि अरमानची पहिली पत्नी पायल मलिकनं अचानक या शोमध्ये भेट दिली. अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिकवर केलेल्या कमेंटबद्दल तिनं विशालशी चर्चा केली. यापूर्वी एका एपिसोडमध्ये विशालनं लवकेश कटारियाला सांगितलं होतं की, "मला कृतिका भाभी खूप आवडते." नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये पायलनं विशालला सांगितलं की, "तू आई आणि पत्नीबद्दल बोलत आहेस. तू त्यांचा आदर करायला हवा. तू कृतिकाबद्दल जे बोललास ते चुकीचे आहे." पायल आणि अरमानसह शोचे होस्ट अनिल कपूर यांनीदेखील विशालला फटकारलं.

विशालनं स्वतःचा केला बचाव : अनिलनं लवकेश कटारियाला विचारलं असता, यावर विशालनं सांगितलं की, "मला कृतिका भाभी खूप आवडते, याचा अर्थ चुकीचा घेतला गेला आहे." यावर पायल म्हटलं की, "जर तू 'दोषी' नव्हता तर त्यानं थेट कृतिकाला सांगण्याऐवजी लवकेशच्या कानात ही कुजबुज का केली?" पायल गेल्यानंतर अरमान विशालशी या प्रकरणाबद्दल बोलायला गेला. यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. अरमानचा संयम सुटला. त्यानं विशालला झापड मारली. त्यानंतर तो आरडाओरडा करताना दिसला. विशाल आणि अरमान दोघेही एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करताना दिसले. इतर स्पर्धक त्यांना एकमेकांपासून दूर ढकलत होते.

बिग बॉस ओटीटीच्या चाहत्यांनी केली 'ही' मागणी : झापड मारल्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्यानं लिहिलं की, "विशालला आमच्या समर्थनाची गरज आहे. आता खूप झाले आहे." दुसऱ्यानं लिहिलं, "जर अरमानला बाहेर काढले नाही तर हा पूर्णपणे पक्षपाती शो आहे." आणखी एकानं म्हटलं, "अरमान मलिकला शोमधून बाहेर काढा." याशिवाय एका चाहत्यानं लिहिले की, "बिग बॉसनं या प्रकरणात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे." अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर चाहते करताना दिसत आहे.

हेही वाचा :

  1. 'मुंज्या' चित्रपटात कोल्हापूरच्या आयुष उलगड्डेचा धुमाकूळ, अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना कसं मिळविल यश? - munjya film News
  2. 'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर 9 दिवसात छप्परफाड कमाई - Kalki 2898 AD Box Office Collection
  3. रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या विशेष चित्रपटांबद्दल... - ranveer singh birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.