ETV Bharat / entertainment

अर्जुन कपूरनं मलायकाबरोबर विभक्त होण्याच्या अफवांदरम्यान केला धक्कादायक फोटो शेअर - arjun kapoor - ARJUN KAPOOR

Arjun Kapoor : अर्जुन कपूरनं मलायकाबरोबर विभक्त होण्याच्या अफवांदरम्यान हेल्थ रिसॉर्टमध्ये आयव्ही ड्रिपसह उपचार घेत असतानाचा फोटो शेअर केला आहे. आता त्याचे चाहते त्याच्यासाठी चिंतेत आहेत.

Arjun Kapoor
अर्जुन कपूर (अर्जुन कपूर (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 2:28 PM IST

मुंबई - Arjun Kapoor : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ब्रेकअप झाल्याच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. अर्जुन आणि मलायका काही काळापासून एकत्र न दिसल्यानं ब्रेकअपबद्दल अंदाज लावला जात आहे. एका संवादादरम्यान प्रतिक्रिया देताना मलायका अरोरानं असं सांगितलं होतं की, "अर्जुन कपूर हा तिच्या हृदयात राहतो." आता अर्जुन कपूरनं त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंपैकी एक फोटो अर्जुन कपूरच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करून टाकणारा आहे. फोटोमध्ये अर्जुन कपूर हा रुग्णालयात दिसत आहे. अर्जुनच्या चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही, कारण तो व्हिटॅमिन थेरपी घेत आहे.

अर्जुन कपूरनं शेअर केला फोटो : अर्जुन कपूर हा ऑस्ट्रियात वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. अर्जुनचे चाहते कमेंट विभागात त्यांची चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं, "सगळं ठीक आहे ना?" दुसऱ्यानं लिहिलं, "तुला काय झाले? सर्व काही ठीक आहे ना ?" आणखी एकानं लिहिलं, "मला आशा आहे की तू ठीक आहेस." अर्जुन कपूरची ही पोस्ट अशा वेळी आली आहे, जेव्हा त्याच्या आणि मलायकाच्या ब्रेकअप होण्याच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. मलायका आणि अर्जुन अनेकदा एकत्र दिसत होते. मात्र काही महिन्यांपासून हे जोडपे एकत्र दिसलेलं नाही.

अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट : अर्जुन कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसला होता. आता पुढं तो ॲक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफसह अनेक स्टार्स आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहायला मिळेल.

हेही वाचा :

  1. 'बजरंगी भाईजान'च्या सीक्वेलबद्दल केला कबीर खाननं खुलासा, वाचा सविस्तर - Bajrangi Bhaijaan
  2. अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा'चा ट्रेलर होईल 'या'दिवशी रिलीज - SARFIRA TRAILER
  3. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमो व्हायरल, सानिया मिर्झानं कपिल शर्माची उडवली खिल्ली... - sania mirza

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.