ETV Bharat / entertainment

लंडनमध्ये काही महिने घालवल्यानंतर अनुष्का शर्मा मुंबईत परतली, व्हिडिओ व्हायरल - Anushka sharma returns to mumbai - ANUSHKA SHARMA RETURNS TO MUMBAI

Anushka Sharma : अनुष्का शर्मा ही नुकतीच मुंबई विमातळावर स्पॉट झाली. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती ऑफ ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे.

Anushka Sharma
अनुष्का शर्मा (अनुष्का शर्मा (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 4, 2024, 11:43 AM IST

मुंबई - Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाल्यानंतर भारतात परतली आहे. ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. अनुष्का बऱ्याच दिवसांनी भारतात परतल्यानंतर आता अनेकजण तिचं सोशल मीडियावर कौतुक करताना दिसत आहेत. अनुष्का विमानतळावर एकटी दिसली. तिचा पती क्रिकेटर विराट कोहली आणि तिची दोन मुलं वामिका आणि अकाय तिच्याबरोबर नव्हते. अनुष्काची 'भारतवापसी' तिच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. मुंबई विमानतळावर अनुष्का शर्मा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. यावेळी तिनं काळी पॅन्ट, जॅकेट आणि सॅन्डल परिधान केली होती. याशिवाय तिनं काळ्या रंगाचा डोळ्यांना चष्मा देखील लावला होता.

अनुष्का शर्मा झाली मुंबई विमानतळावर स्पॉट : अनुष्का शर्मानं विमानतळाच्या बाहेर येताच पापाराझींना पाहून गोड स्माईल दिली. यानंतर तिनं सर्वांना 'हॅलो' म्हटलं आणि गाडीत बसली. आता अनुष्का शर्माचा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. अनुष्का शर्माची ही झलक पाहून तिचे चाहते खूप झाले खुश आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं आहे की, "अभिनेत्री स्लर्फर्म इव्हेंटसाठी येथे पोहोचली आहे." दुसऱ्या एकानं यूजरनं लिहिलं, "अनुष्का खूप सुंदर दिसत आहे." आणखी एका चाहत्यानं लिहिलंय, "तुला पाहून मला खूप छान वाटलं." अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

'चकडा एक्स्प्रेस'मुळे चर्चेत : अनुष्का सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र ती 'चकडा एक्स्प्रेस' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटात ती भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे. अनुष्काचे चाहते तिला या वेगळ्या अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रोसित रॉय करणार आहे. दरम्यान अनुष्का ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती बऱ्याच वेळा आपल्या पती आणि मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान अनुष्का शर्मानं 2021 मध्ये मुलगी वामिकाला आणि चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात मुलगा अकायला जन्म दिला. अकायच्या जन्मानंतर ती लंडनमध्ये आपल्या पतीसह बराच काळ वास्तव्य करतेय.

हेही वाचा :

  1. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा मुलगा अकायचं पहिलं रक्षाबंधन, फोटो व्हायरल - Virat Kohli son Akaay
  2. पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी अपात्र घोषित झाल्यानंतर विनेश फोगटला मिळाली स्टार्सची साथ - Vinesh Phogat
  3. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लंडनमध्ये चक्क लागले भजनाला, मंदिरात भजन ऐकण्यात झाले तल्लीन - Anushka Sharma and Virat Kohli

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.