मुंबई - Anil Kapoor Housefull 5 : अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन स्टारर कॉमेडी ड्रामा चित्रपट 'हाऊसफुल 5'बाबत पुन्हा एकदा एक मोठी अपडेट समोर आली आहे. अलीकडेच या चित्रपटात अभिषेक बच्चननं अधिकृत एंट्री केली होती. आता अनिल कपूरनं 'हाऊसफुल 5' चित्रपट सोडल्याची बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, अनिल कपूर साजिद नाडियादवालाच्या कॉमेडी फ्रँचायझीपासून दूर गेला आहे. आता अनिल कपूरच्या जागी 'अॅनिमल' स्टार एंट्री करणार असल्याचं समजत आहे. आता हा अभिनेता कोण असणार याबदद्दल जाणून घेऊया...
अनिल कपूरची जागा कोण घेणार : तरुण मनसुखानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात साजिदनं अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांना कास्ट केलं असल्याची बातमी होती. आता अनिल कपूरच्या डेट शेड्यूलमुळे तो हा चित्रपट करू शकणार नाही. अनिलच्या जागी 'ॲनिमल'चा खलनायक बॉबी देओल या चित्रपटात एंट्री करणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. 'हाऊसफुल 5'मध्ये चंकी पांडे, क्रिती खरबंदा, सौंदर्या शर्मा, क्रिती सेनॉन आणि नोरा फतेही यांना हे देखील दिसणार असल्याचं बोलले जात आहे. आजकाल साजिद नाडियादवाला सलमान खानबरोबर 'सिकंदर'ची शूटिंग करत आहे.
'हाऊसफुल 5'चं शूटिंग होईल लवकरच सुरू : दरम्यान 'हाऊसफुल 5'चं शूटिंग ऑगस्ट 2024 रोजी सुरू करणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. या चित्रपटाची शूटिंग ही बहुतांश क्रूझवर होणार आहे. क्रूझवर 45 दिवस शूट होईल. अक्षय कुमारच्या चाहत्यांना 'हाऊसफुल 5' साठी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे, कारण हा चित्रपट आता 6 जून 2025 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधी ख्रिसमसच्या मुहूर्तावर डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र त्याआधी अक्षय स्टारर 'सरफिरा' (12 जुलै 2024) आणि 'स्काय फोर्स' (2 ऑक्टोबर 2024) रिलीज होणार आहे. सध्या अक्षय या दोन्ही चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.
हेही वाचा :
- रणबीर कपूर स्टारर 'रामायण'साठी करावी लागणार दीर्घ काळाची प्रतीक्षा, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उघड - Ranbir Kapoor starrer Ramayan
- बिपाशा बसूनं प्रसूतीनंतर मुलगी देवीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, पाहा झलक - Bipasha Basu
- सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला केली अटक - salman khan