ETV Bharat / entertainment

किशोरवयीन मुलांच्या संवेदनशील कथेवरील 'अनन्या व्हॉट इफ' चित्रपट थेट यूट्यूबवर प्रदर्शित - Ananya What If - ANANYA WHAT IF

Ananya What If : शाळा कॉलेजात शिकणाऱ्या मुलांच्यावर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. याचे फायदे असले तरी संवेदनशील मनं असलेल्या या पिढीवर काही गोष्टींचा खोल परिणाम होत असतो. किशोरवयीन मुला मुलींच्या जीवनातील मैत्री, विश्वासघात आणि सोशल मीडियाच्या युगातील त्यांच्या समोर असणाऱ्या आव्हानांवर आधारित 'अनन्या व्हॉट इफ' या चित्रपटाची निर्मिती काही सर्जनशील तरुणांनी एकत्र येऊन केली आहे.

Ananya What If
अनन्या व्हॉट इफ (Ananya What If film Image)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 11:00 AM IST

Updated : Jun 3, 2024, 5:31 PM IST

मुंबई - Ananya What If : मराठी चित्रपटसृष्टीत सातत्यानं नवे प्रयोग होत आले आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा यथायोग्य उपयोग करुन उत्तम कलाकृती बनवण्याची कला खूप कमी लोकांना अवगत असते. चित्रपट बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सृजनशील दिग्दर्शक शिवाजी कचरे यांनी एक संवेदनशील विषयावरच्या चित्रपटाला न्याय देण्यासाठी सर्वस्व पणाला लावून पूर्ण लांबीचा चित्रपट बनवला. थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नाहीत, ओटीटी प्लॅटफॉर्मही पुरेशी दखल घेत नाहीत, मग आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी काही मित्रांनी एकत्र येऊन डिजीटल फिल्म मेकर्स ही आपली निर्मिती संस्था स्थापन केली. आपली कथा तयार केली, आपल्यातलेच कलाकार निवडले, त्यांना प्रशिक्षित केलं, तंत्र समजून घेतलं आणि "अनन्या व्हॉट इफ" हा थ्रिलर मराठी बनवला आणि थेट यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे.

Ananya What If
अनन्या व्हॉट इफ (Ananya What If film Image)

काय आहे "अनन्या व्हॉट इफ"ची कथा?

हा चित्रपट किशोरवयीन मुलींच्या जीवनातील मैत्री, विश्वासघात आणि सोशल मीडियाच्या युगातील त्यांच्या समोर असणाऱ्या आव्हानांवर आधारित आहे. किशोरवयीन मुलांच्या जीवनातील समस्या, त्यांचा संघर्ष, आणि FOMO (फियर ऑफ मिसिंग आउट) यांचा प्रभाव या विषयावर हा चित्रपट थेट प्रकाश टाकतो.

Ananya What If film Image

यामध्ये अनन्या, तनू, आणि रिचा या तीन किशोरवयीन मुलींची कथा आहे. अनन्या आणि तनू या लहानपणापासूनच्या घनिष्ठ मैत्रिणी आहेत. त्यांची मैत्री अतूट आहे, पण त्यांच्या वर्गात रिचा ही मुलगी आल्यापासून त्यांच्या मैत्रीत दुरावा तयार होतो. अनेक नाट्यमय घडामोडी पडद्यावर घडत असताना खुर्टीला खिळवून ठेवणारा नाट्य अनुभव हा चित्रपट देतो. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होते आणि या तीनही मुलींच्या आयुष्यात काय घडतं याचा थरारक अनुभव चित्रपट पाहिल्यावर मिळतो.

किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचा खोलवर मांडलेले प्रसंग, सोशल मीडियाच्या प्रभावाचा परिणाम आणि त्यांच्या जीवनातील आव्हानं यांचा उत्तम मेळ चित्रपटात घालण्यात आला आहे. अनन्या, तनू आणि रिचाच्या भूमिका त्याचं वयातील किशोरवयीन अभिनेत्रींच्या उत्कृष्ट अभिनयामुळे कथा अधिक जीवंत आणि रंजक झाली आहे. कथानकात येणारे वळणं आणि संघर्ष, प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.

Ananya What If
'अनन्या व्हॉट इफ' चित्रपटातील एक दृष्य (Ananya What If film Image)

"अनन्या व्हॉट इफ"ची स्टार कास्ट

या चित्रपटात निकीता पाध्ये हिनं अनन्याची भूमिका साकारली आहे. अनन्याची मैत्रीण तनूच्या भूमिकेत चारुता करंदीकर असून दर्शना जामनेरकरनं रिचाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला न्याय दिला आहे. मयूरी वाघ, मानसी सबंनीस, अस्मिता चांदणे, हरिता ठाकूर, सलील छेपे, ऋषिकेश उत्पात, अमर लवटे, राघव अगरवाल, दिंगतर पोतदार इत्यादी कलाकारांनी आपआपल्या भूमिका चोख वटवल्या आहेत. असिम वैद्य यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं सानिका जगता आणि इंद्रायणी चव्हाण यांनी गायलंय. डिजीटल फिल्म मेकर्सच्या टीमनं एक मोठं शिवधनुष्य केवळ उचलायचा प्रयत्न केलेला नाही तर यशस्वीपणे उचलून यशस्वी होऊन दाखवलंय. या चित्रपटाची पटकथा, सिनेमॅटोग्राफी, संकलन आणि दिग्दर्शन अशी चतुरस्त्र कामगिरी शिवाजी कचरे यांनी पार पाडली आहे.

'अनन्या व्हॉट इफ' हा चित्रपट सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या किशोरवयीन मुलांनी जरुर पहावा. चित्रपटाचा संदेश, त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचे प्रदर्शन आणि त्यातून मिळणारी शिकवण, यामुळे हा चित्रपट अधिक महत्त्वपूर्ण ठरतो.किशोरवयीन मुलांच्या जीवनातील वास्तवाचा अनुभव देणारा 'अनन्या व्हॉट इफ' हा चित्रपट डिजिटल फिल्ममेकर्स यूट्यूब चॅनेलवर मोफत उपलब्ध आहे.

हेही वाचा -

पनवेल फार्महाऊसबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी सलमान खानच्या फॅनगर्लला घेतलं पोलिसांनी ताब्यात - Salman Khan fan girl

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमधील शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा क्रूझवरील व्हिडिओ व्हायरल - Anant Radhika Pre Wedding

"भूतकाळाच्या पिंजऱ्यात अडकायचं की भविष्याचा वेध घ्यायचा..." : अर्जुन कपूरची गूढ पोस्ट - Arjun Kapoor Cryptic Post

Last Updated : Jun 3, 2024, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.