ETV Bharat / entertainment

अनन्या पांडे स्वतःला गिफ्ट दिली 2 कोटीची लक्झरी एसयूव्ही कार - Ananya Panday - ANANYA PANDAY

Ananya Panday Buys SUV : अनन्या पांडेने स्वत:ला आकर्षक कार भेट दिली आहे. तिनं 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीची नवीन लक्झरी एसयूव्ही खरेदी केली आहे. अनन्याचे तिच्या नवीन गाडीसह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहेत.

Ananya Panday
अनन्या पांडे (Ananya Panday (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 11:59 AM IST

मुंबई - Ananya Panday Buys SUV : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याबरोबरच्या कथित जवळीकतेमुळे सध्या चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने अलीकडेच स्वत:साठी एक भव्य भेट दिली आहे. 2 कोटींहून अधिक किमतीच्या तिच्या नवीन आलिशान एसयूव्हीसह अनन्या शहरात फिरताना दिसली.

पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनन्याची मूळची पांढऱ्या रंगाची रेंज रोव्हर देखील दिसत आहे. या गाडीला हार घालण्यात आला आहे. यावेळी पापाराझींनी तिचे अभिनंदन केलं आणि तिचे फोटोसेशनही केलं. कमी मेकअपमध्ये वावरणाऱ्या अनन्यानं तिच्या अ‍ॅक्सेसरीजमध्ये नाजूक कानातले आणि रिस्टबँडचा समावेश केला होता.

तिच्या व्यावसायिक कमिटमेंटच्याबाबतीत बोलायचं तरी, अनन्या आगामी अमेझॉन प्राइम सीरिज 'कॉल मी बे' मधील तिच्या भूमिकेसाठी तयारी करत आहे. ही मालिका 6 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या शोमध्ये एका अब्जाधीश फॅशनिस्टाच्या प्रवासाचा इतिहास आहे, ज्याला एका घोटाळ्यामुळे कौटुंबिक वियोगाचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त, अभिनेत्री अनन्या ही 'कंट्रोल' आणि 'द अनटोल्ड स्टोरी'मध्ये तिच्या भूमिकांसाठी तयारी करत आहे.

अनन्याचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर शेवटची 'खो गया हम कहाँ' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्याबरोबर तिच्या अभिनयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आपल्या कामाचे कौतुक झाले किंवा टीका झाली तरी स्थिर राहून परिस्थितीला समोरं जाण्याची कला तिनं अवगत केली आहे. तिच्या अभिनयाबद्दल तिला साकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी अनन्या सावध प्रतिक्रिया देताना दिसली.

चंकी पांडेची मुलगी असलेली अनन्या चुकामधून शिकण्याची तयारी ठेवत आली आहे. ती अभिनेत्री म्हणून घडत असलेल्याचे श्रेय ती मिळत असलेल्या अनुभवाला देते. 'खो गए हम कहाँ' आणि त्या अगोदर रिलीज झालेला 'गहराईयाँ' या चित्रपटातील तिच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.