मुंबई - किम कार्दशियनच्या भारतात आगमनानंतर तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन गुरुवारी रात्री अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यासाठी मुंबईत पोहोचल्या. विमानतळावर तैनात असलेल्या पापाराझींनी कालिना विमानतळातून बाहेर पडताना दोन्ही बहिणींना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
किमने तिच्या कारमध्ये बसण्यापूर्वी फोटोग्राफर्सना अभिवादन केलं. एअरपोर्ट आउटिंगसाठी किमने न्यूड बॉडी हगिंग गाउन आणि काळा सनग्लासेस निवडले होते. दुसरीकडे, ख्लोनं पांढरा क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली होती. किम आणि ख्लोचं मुंबईत आगमन झालेल्या फोटो आणि व्हिडिओंनी नेटिझन्सना वेड लावलं आहे.
दरम्यान, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली जे-योंग हे देखील लग्नासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा जोडीदार निक जोनास हे देखील गुरुवारी मुंबईत आले. ते 12 जुलै रोजी अनंत आणि राधिकाच्या लग्नाला हजर राहणार आहेत.
याआधी, जागतिक पॉप आयकॉन जस्टिन बीबर मुंबईत आला आहे. त्यानं गेल्या आठवड्यात झालेल्या अनंत आणि राधिकाच्या संगीत समारंभात शेकडो लोकांचे मनोरंजन केलं. हॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार या वर्षातील सर्वात अपेक्षित लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. प्राचीन हिंदू वेदांनुसार विवाह सोहळ्याचे काळजीपूर्वक नियोजन केलं जातं आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाचा, शुक्रवार, 12 जुलै रोजी मुख्य विधी सुरू होईल. पाहुण्यांना विनंती केली जातं आहे की त्यांनी या प्रसंगाची भावना पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी पारंपारिक भारतीय पोशाख घालावा. शनिवार, 13 जुलै रोजी, विवाहसोहळा किंवा शुभ आशीर्वाद सोहळा पार पडेल. रविवारी 14 जुलै रोजी होणारा मंगल उत्सव हा शेवटचा कार्यक्रम असल्यानं या विवाह सोहळ्याची समाप्ती होईल.
हेही वाचा -
- अनंत-राधिकाचा शाही विवाह सोहळा, बॉलिवूड, हॉलिवूडसह विविध क्षेत्रातील दिग्गज राहणार हजर; पाहा लिस्ट - Radhika and Anant Ambani Wedding
- 100 जेट, हजारो NSG कमांडो तैनात; अनंत-राधिकाच्या शाही लग्नाची तयारी पूर्ण, 'या' शुभ मुहूर्तावर वरमाला विधी - Anant Radhika wedding
- अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या आधी मुकेश, नीता अंबानी यांनी लावली 50 वंचित जोडप्यांची लग्नं - Mukesh and Nita Ambani