ETV Bharat / entertainment

अनंत-राधिका यांचं हनिमून डेस्टिनेशन ठरलं! पण प्लॅन... - Anant Ambani and Radhika Merchant - ANANT AMBANI AND RADHIKA MERCHANT

Anant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हनिमूनबद्दल आता चर्चा होताना दिसत आहे. आता हे जोडपे हनिमूनला कुठे जाऊ शकतात हे जाणून घ्या...

anant  and radhika
अनंत आणि राधिका (Source : ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 6:23 PM IST

मुंबई Anant Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीनं राधिका मर्चंटसोबत विवाह केला. या जोडप्याच्या भव्य लग्नाला देश-विदेशातील मान्यवर पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अनंत आणि राधिका यांचा विवाह झाल्यानंतर आता अनेकजण या जोडप्याच्या हनिमून प्लॅनची चर्चा करत आहेत. पहिली अफवा अशी होती की, लग्नानंतर हे जोडपे रोमँटिक हनिमूनसाठी फिजी बेटावर जाऊ शकतात. यानंतर अनंत आणि राधिका हनिमूनसाठी दक्षिण आफ्रिकेला पर्याय म्हणूनही ठेवू शकतात, असं बोललं जात होतं.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं हनिमून : स्वित्झर्लंड, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, दक्षिण आफ्रिका, बोरा बोरा आयलंड, फिजी आयलंड अशी अनेक हनिमून डेस्टिनेशन्सची नावे समोर येत होती. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि राधिका हे लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाणार नाहीत. त्यांनी हनिमूनचा प्लॅन पुढे ढकलण्यात आला आहे. लग्नानंतरचे विधी पूर्ण करून हे जोडपे हनिमूनला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका दोघेही पारंपरिक गुजराती कुटुंबातून आहेत. वधू आणि वर दोघांच्याही घरी लग्नानंतरचे अनेक विधी असतात. अनंत आणि राधिका यांच्यासाठी लग्नानंतर 'सेवा' आणि 'दान' तसंच काही विशेष पूजा विधींचे आयोजन करण्यात आले आहेत.

अनंत आणि राधिका लग्नानंतर विधींमध्ये व्यस्त : अनंत आणि राधिका लग्नानंतर आता वेगवेगळ्या विधींमध्ये खूप व्यस्त आहेत. 14 जुलै रोजी या जोडप्याच्या लग्नाचे रिसेप्शन आहे. लग्नानंतरच्या सर्व विधी करून हे जोडपे हनिमूनला रवाना होतील. हनिमूनबाबत अंबानी कुटुंबाकडून अद्याप काहीही जाहीर करण्यात आलं नाही. अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन यावर्षी मार्चमध्ये झालं होतं. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी दुसरे प्री-वेडिंग फंक्शन पार पडलं होतं. दरम्यान, 12 जुलै रोजी झालेल्या लग्नात जगभरातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. अनंत आणि राधिका आता अधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानींच्या लग्नाला नयनताराची हजेरी, कॅप्टन कूलसह साक्षीबरोबरचा फोटो केला शेअर - NAYANTHARA NEWS
  2. अनंत-राधिकाच्या लग्नात शाहरुख खानला भेटून जॉन सीना झाला रोमांचित, केली पोस्ट शेअर - John cena and shahrukh khan
  3. अनंत अंबानींकडून शाहरूखसह खास मित्रांना महागड्या घड्याळाची भेट, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का - Anant Radhika Wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.