ETV Bharat / entertainment

अनंत अंबानीनं कृष्णा काली मातेला लग्नासाठी दिलं आमंत्रण, व्हिडिओ व्हायरल - Anant Ambani and Radhika Merchant - ANANT AMBANI AND RADHIKA MERCHANT

Anant Ambani: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्यांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी कृष्णा काली मंदिरात पोहोचला. यावेळी त्याच्याबरोबर वीर आणि शिखर पहारियाही होते. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Anant Ambani
अनंत अंबानी ((फाइल फोटो) (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 1:57 PM IST

मुंबई - Anant Ambani : देशातील अब्जाधीश दाम्पत्य मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्न करणार आहे. अंबानी कुटुंबानेही या लग्नाची आमंत्रणे देण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवुडमधील काही मोठ्या व्यक्तींना वैयक्तिकरित्या आमंत्रित केल्यानंतर, आता अनंत अंबानी गेल्या रविवारी कृष्णा काली मंदिरात पोहोचला. त्याच्यबरोबर शिखर पहाडिया आणि वीर पहाडिया देखील यावेळी स्पॉट झाले. गेल्या रविवारी संध्याकाळी उशिरा अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत आणि मित्रांसह महाराष्ट्रातील कृष्णा काली माता मंदिरात गेल्यानंतर चर्चेत आला.

अनंत अंबानी स्पॉट झाला कृष्ण काली मंदिरात : या मंदिरातून अनंतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो काली मंदिरात हवन आणि पूजा करताना दिसत आहे. जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि त्याचा अभिनेता-भाऊ वीर पहाडियाही देखील व्हिडिओमध्ये पुजा करताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये अनंत काली पूजा करत आहे. पूजा केल्यानंतर अनंतची माध्यम प्रतिनिधींशी भेट झाली. यावेळी त्याच्याबरोबर भरत मेहरादेखील उपस्थित होते. कृष्ण काली मंदिरातची स्थापना त्यांनीच केली आहे. अनंत अंबानी नेरळ येथील कृष्ण काली मंदिरात असल्याचं सांगत उपस्थित असलेल्या माध्यमांचेही आभार मानले. अनंत राधिकाशी लग्न करण्यापूर्वी तो देव-देवतांना आमंत्रण देण्यासाठी अनेक ठिकाणी जाताना दिसत आहे.

अनंत आणि राधिताचं लग्न : अनंतच्या याआधी 30 जूनला महिन्यात त्याची बहीण ईशा अंबानीबरोबर मंदिरात दिसला होता. तो पूजा करताना यावेळी दिसला होता. याशिवाय त्यानं हवनातदेखील भाग घेतला होता. यावेळी ईशानं गुलाबी रंगाचा सलवार-सूट सेट घातला होता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी होणार आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अंबानी कुटुंबातील धाकट्या मुलाचे भव्य लग्न होणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हजर राहतील.

हेही वाचा :

  1. "तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं...", विश्वचषक जिंकल्यानंतर विराटची अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट - Virat Kohli Instagram Post
  2. गायक अभिजीत भट्टाचार्यनं सलमान खानच्या हिट गाण्याबाबत केला धक्कादायक खुलासा - SINGER ABHIJEET BHATTACHARYA
  3. डेब्यू प्रोडक्शन 'क्रॅक'सह करोडो गमावल्यानंतर विद्युत जामवाल फ्रेंच सर्कसमध्ये झाला सामील - VIDYUT JAMMWAL

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.