ETV Bharat / entertainment

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा 'संगीत सोहळा' संपन्न - sangeet ceremony - SANGEET CEREMONY

Sangeet Ceremony : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची संगीत सेरेमनी 5 जुलै रोजी झाली असून या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्सनं हजेरी लावली. आता या कार्यक्रमामधील काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

Sangeet Ceremony
संगीत सोहळा ((IMAGE- ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 10:32 AM IST

मुंबई Sangeet Ceremony : अभिनेता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा शुक्रवार, 5 जुलै रोजी भव्य संगीत सोहळा पार पडला. यामध्ये बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि फॅशन जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हे जोडपं 12 जुलै रोजी लग्न करणार आहे. 5 जुलै रोजी सलमान खान हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात सहभागी होण्यासाठी पोहोचला. यावेळी त्यानं काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान केला. यात तो खूप सुंदर दिसत होता. रेड कार्पेटवर पोहोचलेल्या भाईजाननं पापाराझीचं हात जोडून अभिवादन केलं. या कार्यक्रमात अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आपल्या स्टाईलिश अंदाजात दिसले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची संगीत सेरेमनी : यावेळी आलियानं सुंदर काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला. रणबीर इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये खूपच देखणा दिसत होता. यावेळी रणबीर, आलिया आणि आदित्य यांनी रेड कार्पेटवर एकत्र पापाराझींसाठी पोझ दिली. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात सहभागी होण्यासाठी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचली. सोनेरी रंगाच्या चमकदार साडीत धक-धक गर्ल खूप सुंदर आणि क्यूट दिसत होती. याशिवाय सारा अली खाननं या कार्यक्रमासाठी गोल्डन लेहेंगा परिधान केला.

सलमान खानचा डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल : पापाराझीनं या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या कार्यक्रमात सलमान पोहोचताच त्याला लोक 'सिकंदर' आणि 'टायगर' म्हणू लागले. हे ऐकून त्यानं सुंदर अशी स्माईल दिली. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'भाईजान'नं संगीत सेरेमनीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. अनंत अंबानीबरोबर त्यांनं स्टेजवर 'ऐसा पहली बार हुआ है 17-18 साल में' या गाण्यावर सुंदर डान्स केला. या परफॉर्मन्सचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे.

हेही वाचा :

  1. 'मिर्झापूर'चा चार वर्षानंतर सीझन 3 रिलीज, सोशल मीडियावर प्रेक्षकांचा 'गजब भौकाल हैं'! - Mirzapur Season 3 X Review
  2. कंगना राणौतला झापड मारणाऱ्या कुलविंदर कौरची बदली? काय आहे प्रकरण जाणून घ्या... - KULWINDER KAUR IS STILL SUSPENDED
  3. स्टायलिश दिसायचं आहे... तर करा आपल्या वॉर्डरोबमध्ये 'या' सुंदर ड्रेसचा समावेश - monsoon fashion

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.