ETV Bharat / entertainment

शाहरुख चमकला, तापसी लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली, स्टार स्टडेड पार्टीत इम्रान हाश्मीची मल्लिकाशी भेट - ANAND PANDIT PARTY - ANAND PANDIT PARTY

ANAND PANDIT PARTY : चित्रपट निर्माता आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स हजर होते. शाहरुख खानच्या उपस्थितीने पार्टीला चार चाँद लागले, तर तापसी पन्नू, इम्रान हाश्मी, भूमी पेडणेकर, राजकुमार राव, आयुष्मान खुराना अशी तारे तारकांची मांदियाळी उपस्थित होती.

ANAND PANDIT PARTY
आनंद पंडित पार्टीत सेलेब्रिटी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 11:20 AM IST

मुंबई - ANAND PANDIT PARTY : चित्रपट निर्माता आनंद पंडित यांनी त्यांची लेक ऐश्वर्या आणि जावई साहिलसाठी भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला हिंद चित्रपट जगतातील अनेक तारे आणि तारका यांची मांदियाळी पाहायला मिळाली. या खास पार्टी सोहळ्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान दिमाखात हजर राहिला. यावेळी त्यानं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. उपस्थित फोटोग्राफर्सना अदाब करत त्यानं अभिवादन केलं आणि आनंद पंडित यांच्या बरोबर फोटोसाठी पोजही दिली.

या रिसेप्शन पार्टीमध्ये अलिकडेच लग्न झालेली अभिनेत्री तापसी पन्नू या प्रसंगी लाल रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती. दागिने, हेअरस्टाईल व मेकअपसह तिनं स्वतःला छान सजवलं होतं. तापसी पन्नू आणि तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड मॅथियास बोई यांनी 23 मार्च रोजी उदयपूर येथे एका इंटिमेट समारंभात लग्न केले. लग्नाला जोडप्याचे जवळचे मित्र आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तथापि, तापसी आणि मथिया या दोघांनीही त्यांच्या लग्नाविषयी मौन बाळगणं पसंत केलंय. त्यांनी लग्नाचे कोणतेही अपडेट सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. तापसी या पार्टीमध्ये एकटीच हजर होती.

अभिनेता इमरान हाश्मीनं रात्रीच्या रिसेप्शन पार्टी थीमसाठी काळ्या रंगाचा पोशाख घातला होता. या कार्यक्रमादरम्यान त्याने मर्डर चित्रपटातील त्याची सहकलाकार मल्लिका शेरावतची भेट घेतली. त्यांनी गप्पा मारताना छान वेळ घालवला आणि फोटोग्राफर्सना पोजही दिल्या. अभिनेता राजकुमार रावने त्याची पत्नी अभिनेत्री पत्रलेखा पॉलसह जबरदस्त हजेरी लावली. अलिकडे राजकुमार रावचा आगामी 'श्रीकांत' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याला प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला आहे.

आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांना मोहित करणारा अभिनेता आयुष्मान खुरानादेखील आपल्या सुंदर लूकसह पार्टीत हजर होता. यावेळी अभिनेत्री भूमी पेडणेकरने काळ्या रंगाच्या साडीसह ब्लॅक अँड व्हाईट ब्लाउजसह उफस्थितांवर छाप सोडली. अलिकडेच 'द केरळ स्टोरी'मुळे लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अदा शर्मा पार्टीत सामील झाली होती. बॉलिवूडच्या इतर लोकप्रिय कलाकारांमध्ये जितेंद्र, तनिषा मुखर्जी, अंकिता लोखंडे, मनीषा पॉल असे अनेक सेलेब्रिटींनी या पार्टीत आपला जलवा दाखवला.

हेही वाचा -

  1. ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 'फुले'च्या टीमनं नवीन मोशन पोस्टर केलं प्रदर्शित - Phule New Poster
  2. अदा शर्मानं गायलं प्रथमेश लघाटेचं भक्तीगीत, व्हिडिओ व्हायरल - Prathamesh Laghate and Adah sharma
  3. स्टार स्टडेट ईद पार्टीमध्ये सलमान खानचा रुबाब, जल्लोष करणाऱ्या चाहत्यांना केलं अभिवादन - Salman Khan Eid

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.