मुंबई - फोर्ब्स इंडिया वुमन पॉवर 2024 हा मानाचा पुरस्कार भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्री अमृता सुभाष हिला देण्यात आला. फोर्ब्स इंडियाच्या वतीनं नितीन सिंग आणि डॉ. आरती सिंग यांच्या हस्ते अभिनेत्री अमृता सुभाषला आयकॉन ऑफ एक्सलन्सने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृतानं एक सोशल मीडिया पोस्ट लिहून आभार व्यक्त केले आहेत.
अमृता सुभाषनं एक फोटो स्ट्रिंग शेअर करत फोर्ब्स इंडियाचे आभार मानले. तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय, "या पुरस्कारासाठी फोर्ब्स इंडियाचे खूप खूप आभार. या पुरस्काराचा अर्थ खूप मोठा आहे. इतक्या शक्तिशाली महिलांनी भरलेल्या जागी उपस्थित असणे खूप छान होते. हे खूप आनंदी आणि प्रेरणादायी होते. या पुरस्काराबद्दल मी कृतज्ञ आहे. फोर्ब्स हे नाव खूप मानाचं आहे. त्यांच्या नावानं मिळालेल्या या पुरस्काराचं मोल खूप आगळं आहे."
हा सेल्फ मेड महिलांसाठीचा कार्यक्रम त्यांनी साध्य केलेल्या यशासाठीचं सन्मानाचं व्यासपीठ बनलं आहे. महिलांनी एकत्र यावं, विचारांची देवाण घेवाण करावी आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची ही एक संधी आहे. वुमन पॉवरच्या यादीमध्ये आयएएस अधिकारी, एक जागतिक बँकर, एक रिअल इस्टेट उच्च अधिकारी, महिला क्रिकेटर, बुद्धिबळ ग्रँडमास्टर, अभिनेत्री, मॉडेल, सामाजिक कार्यकर्ती, अन्न उद्योजिका, बार उद्योजिका आणि इतर अनेक क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. या महिलांना त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल सन्मानित केले जात असताना, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
फोर्ब्स इंडियानं 2024 मध्ये भारतातील टॉप सेल्फ मेड महिलांची निवड केली. यामध्ये अभिनेत्री अमृता सुभाषला आयकॉन ऑफ एक्सलन्सने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांचा डियाजिओ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिना नागराजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पत्रकार आणि जंगल राणी आणि बडी दीदी युनियनच्या संस्थापक सदस्य जयंती बुरुडा, एक मॉडेल आणि सामग्री निर्माती मलेशा खरवा, उर्फ झोपडपट्टी राजकुमारी, कोटक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सच्या सीईओ लक्ष्मी अय्यर, सेल्फ-मेड वुमन नामिनीक्षी सिंग, 23 लाख अंगणवाडी सेविकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रानिमा दास हिना, एज्युकेट गर्ल्सच्या संस्थापक आणि बोर्ड सदस्या सफिना हुसैन, इम्पॅक्ट आणि ईएसजीच्या संचालिका सौम्या सूर्यनारायण, क्वेस्ट रिटेलच्या ग्रुप सीईओ श्रीती मल्होत्रा, चित्रपट निर्माती अश्विनी अय्यर तिवारी, सीईओ देवलिना भट्टाचार्जी, रॉय कपूर फिल्म्सच्या मालविका खत्री, अभिनेत्री कुशा कपिला यांचा फोर्ब्स इंडियाच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
हेही वाचा -
- मनोज बाजपेयीच्या वाढदिवसानिमित्त 'भैय्या जी'मधील 'बाघ का करेजा' गाण्याचा टीझर रिलीज - manoj bajpayee birthday
- 'ड्रीम गर्ल 3'मधून अनन्या पांडेचा पत्ता कट 'चकचक गर्ल' आयुष्मान खुरानाबरोबर करणार धमाल - sara replaces ananya
- FTII चा कान्स 2024 मध्ये डंका: पायल कपाडिया आणि मैसम अली यांच्यानंतर FTII विद्यार्थ्यांच्या फिल्मचीही निवड - Cannes 2024