मुंबई - Amitabh traveled undersea tunnel : अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या अलीकडेच वाहतुकीसाठी सुरू झालेल्या कोस्टल रोडवरील बोगद्यातून प्रवास करतानाचा व्हिडिओ मंगळवारी ऑनलाइन शेअर केला आहे. हा बोगदा मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडणारा मार्ग आहे. दोन ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ यामुळे खूप वाचणार असल्यामुळे अमिताभ यांनी या बोगद्याला एक चमत्कार असल्याचं म्हटलंय.
वरळी आणि मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या पाण्याखालील बोगद्याचं अलिकडे उद्घाटन झालं. बोगद्यातून प्रवास करत असताना अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. बिग बी यांनी त्यांच्या कारच्या आतून बोगद्यातून जातानाचा एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओबरोबर त्यांनी लिहिलं, "टनेलमध्ये पहिल्यांदाच गेलो - हाजी अलीच्या आधी प्रवेश करा आणि हाफ वे टू मरीन ड्राइव्ह .. एक चमत्कार !!"
अमिताभ यांच्या या व्हिडिओला काही मिनीटात 50,000 अधिक व्ह्यूव्ह मिळाले आहेत. असंख्य प्रतिक्रिया यावर चाहत्यांनी दिल्या आहेत. चाहत्यांनीही त्यांचे स्वतःचे अनुभव सांगून बच्चन यांच्या उत्साहात भर घातली. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, गायिका इला अरुण यांनी कमेंट केली: "फन्टॅस्टिक. आम्हीही या बोगद्याचा वापर केला. हा एक अद्भूत अनुभव आहे."
यापूर्वी अमिताभ एका क्रिकेट स्टेडियममध्ये दिसले होते. आपल्या आवडत्या आयपीएल क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी ते आले होते. बच्चन हे खेळ प्रेमी आहेत. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ते नेहमी विविध खेळांबद्दलचा उत्साह व्यक्त करत असतात. त्यांनी आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनीही आयपीएलदरम्यान मुंबई इंडियन्सला सातत्याने पाठिंबा दिला आहे.
बिग बी सोमवारी वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना एमआयला पाठिंबा देताना दिसले. एमआयच्या पराभवानंतर बच्चन स्टेडियममधून बाहेर पडल्यावर तेही थोडे निराश झाल्याचं दिसले. बच्चन त्यांच्या आयुष्यातील किस्से शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात, ही बाब त्यांच्या समर्थकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. कामाच्या आघाडीवर, बच्चन प्रभास आणि दीपिका पदुकोण बरोबर 'कल्की 2898 एडी' मध्ये दिसणार आहेत.
हेही वाचा -