मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' लोकप्रिय शोच्या सीझन 16 सह परत आले आहेत. मेगास्टारने त्याच्या X हँडलवरील पोस्टच्या मालिकेत 16 व्या सीझनची घोषणा केली आहे. हा ऑनलाइन क्विझ शो 2000 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून देशभरातील चाहत्यांचा हा आवडता शो बनला आहे. आता या शोचा नवीन सीझन प्रेक्षकांना परत एकदा मनोरंजन आणि ज्ञानाची पर्वणी ठरणार आहे.
T 5082 - BACK to KBC 16th season .. pic.twitter.com/IRxLU6r6VJ
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 25, 2024
ज्येष्ठ बच्चन यांनी 'केबीसी 16' शोच्या सेटवरील एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. "KBC 16व्या सीझनकडे परत.." असं म्हणत बच्चन यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत बिग बी स्टेजकडे धावताना दिसत आहेत. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय: "हो परत आणि तरीही नित्यक्रमात कोणताही बदल नाही - धावणं चालू आहे."
T 5083 - yes back and still no change in routine - the run is on .. pic.twitter.com/pE4L7baGBn
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 25, 2024
यापूर्वी, सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर अमिताभ यांचा समावेश असलेला प्रोमो शेअर केला होता आणि सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं होतं की, "जिंदगी है, हर मोड पर सवाल पूछेगी, जवाब तो देना होगा. देखिए 'कौन बनेगा करोडपती', 12 ऑगस्ट से सोम-शुक्र, रात 9 बजे सिर्फ सोनी एन्टरटेन्मेंट टेलीव्हिजन पर."
अमिताभ बच्चन यांनी 2000 मध्ये 'केबीसी'च्या पहिल्या सीझनसह टेलिव्हिजनवर इतिहास रचला होता. या शोबरोरबर बच्चन यांचं नाव कायमचं जोडलं गेलं. तिसऱ्या सीझनचा अपवाद वगळता बच्चन यांनी पदार्पणाच्या सीझनपासून या शोचा होस्ट म्हणून टीव्ही जगतावर राज्य केलं आहे.
नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' या भव्य चित्रपटात अमिताभ बच्चन अखेरचे ऑनस्क्रीन दिसले होते. अभिनेता प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि इतरांचा समावेश असलेल्या मॅग्नम ओपससाठी कलाकारांच्या जोडीमध्ये सामील झाले होते. आगामी काळात बिग बी रजनीकांतबरोबर 'वेट्टय्यान' हा चित्रपट करत आहेत.