मुंबई - Black Movie : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'ब्लॅक' चित्रपटाला 19 वर्षे पूर्ण होत आहेत. अलीकडेच अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, ''ब्लॅक रिलीज होऊन 19 वर्षे झाली आहेत आणि आज आम्ही नेटफ्लिक्सवर पहिले डिजिटल रिलीज साजरे करत आहोत! देबराज आणि मिशेल यांचा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.'' चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'ब्लॅक' चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
'ब्लॅक' चित्रपट झाला ओटीटीवर रिलीज : 'ब्लॅक' हा चित्रपट अनेकांना खूप आवडला होता आणि याचे सर्व थरातून कौतुक झालं होतं. आजही लोकांकडून राणी आणि अमिताभ यांच्या अभिनयाची प्रशंसा केली जाते. आता निर्मात्यांनी या चित्रपटाला 19 पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. रविवारी, 4 फेब्रुवारी रोजी, अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर चित्रपट 'ब्लॅक'च्या पहिल्या डिजिटल रिलीजची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात बिग बींनं शिक्षक देबराजची भूमिका साकारली होती. तर राणी मुखर्जीने बहिरेपणा आणि अंधत्वाशी संघर्ष करणाऱ्या मिशेलची भूमिका साकारली होती.
'ब्लॅक' चित्रपटाची कहाणी : या चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. 'ब्लॅक'मधील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटात अंध आणि बहिरेपणा असलेल्या विद्यार्थिनीची कहाणी दाखवण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांनी सह-लिखित या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी असून आयशा कपूर, सलोमी रॉय, झुल वेलानी, विजय कृष्णा, शेरनाझ पटेल, आडीब कमल आणि धृतिमान चॅटर्जी या कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहेत. या चित्रपटामध्ये रणबीर कपूरनं कॅमिओ रोल केला होता. रणबीर आणि सोनम कपूर 'ब्लॅक' चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शकही होते.
हेही वाचा :
- संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचं आयोजन कधी? पंतप्रधान मोदींनाही मिळालयं नामांकन
- प्रेक्षकांच मनोरंजन करताना कॅन्सरशी दिला लढा, सोनाली बेंद्रे ते किरण खेर 'या' सेलिब्रिटींनी दाखविली हिंमत
- कर्करोगाविरोधात लढा देणाऱ्या पत्नीकरिता आयुष्मान खुरानानं पोस्ट केली शेअर, संघर्ष केल्यानं केलं कौतुक