ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चनचा मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो - अमिताभ बच्चन फोटो व्हायरल

Amitabh bachchan : अभिनेता अमिताभ बच्चनचा एक फोटो सोशल मीडियावर आला आहे. हा फोटो खूप मजेशीर आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

Amitabh bachchan
अमिताभ बच्चन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 7:09 PM IST

मुंबई - Amitabh bachchan : दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे त्याच्या चित्रपटांमुळे कायमचं चर्चेत असतात, दरम्यान यावेळी ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते सर्व चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना, की हा कुठला फोटो आहे, ज्यामुळे अनेकजणांनाच्या चेहऱ्यावर हसू येत आहेत. बिग बीचा हा फोटो पाहून अनेकजण सोशल मीडियावर त्याचं कौतुक करत आहेत. अमिताभ यांचा विनोदी चेहरा पाहून चाहते या फोटोच्या पोस्टमध्ये कमेंट्स करत आहेत.

अमिताभ बच्चननं शेअर केला फोटो : अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ''कृपया या पोस्टसाठी कोणी शब्द सुचवू शकेल का?'' यासोबत त्यांनी हात जोडलेले तीन इमोटिकॉन्सही शेअर केले आहेत. अमिताभ यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, 'खाइके पान बनारस वाला' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'वाह सर खूप सुंदर'. आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''या फोटोमध्ये तुम्ही छान दिसत आहेत. हा फोटो सुंदर आहे.''

अमिताभ बच्चन वर्कफ्रंट : दरम्यान, अमिताभ बच्चनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ते त्याच्या शेवटी रिलीज झालेल्या 'गणपथ'मध्ये क्रिती सेनॉन आणि टायगर श्रॉफसोबत दिसले होते. याशिवाय ते 'कल्की 2898 एडी' या चित्रपटामध्ये साऊथ स्टार प्रभासोबत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, कमल हसन, दिशा पटानी आणि इतर कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 9 मे, 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलंय. पुढं बिग बी हे 'वेट्टैयान' या चित्रपटामध्ये रजनीकांतसोबत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

  1. प्रसिद्ध पॉप स्टार 'डॅनी ली'चं लिपोसक्शन सर्जरीमुळं निधन; का केली जाते ही सर्जरी?
  2. 'किलर सूप' वेब सीरीजनं जिंकली चाहत्यांची मनं, मनोज वाजपेयी आहे दुहेरी भूमिकेत!
  3. 'देसी गर्ल'चा पती निक जोनसनं मुंबई कॉन्सर्टमध्ये केली धमाल; तापसी पन्नूनं शेअर केला व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.