मुंबई - अभिनेत्री निम्रत कौर आपला 'दसवी' चित्रपटाचा सहकलाकार अभिषेक बच्चन बरोबर टेडिंग करत असल्यांच्या चर्चांना उधाण आलं आहे. लोकांना त्यांच्या मैत्रीबद्दल हेवा वाटावा असं एक विनोदी रील निम्रतनं अलीकडेच शेअर केलंय. या रीलमध्ये ती जमिनीवर बसून एका ट्रेंडिंग डायलॉगशी ओठ-सिंक करताना दिसते. यात ती म्हणते की, ''फ्रेंडशिप इतकी पक्की असली पाहिजे की, ते पाहून लोक जळले पाहिजेत आणि त्यांनी व्वा म्हटलं पाहिजे.'' हा डायलॉग पंजाबी भाषेत असून यावर ती आपले ओठ -सिंक करताना दिसते.
निम्रत कौरनं या रीलला दिलेल्या शीर्षकामध्ये म्हटलंय की, "माझी आणि केसी (करम चंद ) ची दोस्ती अशीच आहे. तुम्ही तुमच्या BFF ला टॅग करा!!"
सोमवारी निम्रत कौरनं तिच्या इन्स्टा स्टोरीजमधून राम दासनचे एक प्रेरणादायी कोटही शेअर केलं आहे. यात तिनं लिहिलंय, "आपला प्रवास हा जीवनाच्या खूप खोलवर रुजलेला आहे आणि तरीही त्याच्याशी खूप कमी जोडला गेलाय."
निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन रिलेशनशिपमध्ये आहेत आणि 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या "दसवी" या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली होती अशा आशयाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. सोशल मीडियावर काही जण निम्रतवर अभिषेक आणि ऐश्वर्या रायचे लग्न मोडल्याचा आरोप करत आहेत. तथापि, बच्चन कुटुंबाच्या जवळच्या स्त्रोताने या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
“या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही. आम्हाला आश्चर्य वाटते की त्या महिलेने (निम्रत कौर) नकार का दिला नाही. अभिषेक मौन बाळगून आहे कारण त्याच्या आयुष्यात सध्या बरेच काही चालू आहे आणि त्याला कोणतेही वाद टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” असं बच्चन परिवाच्या जवळ्या व्यक्तीनं सांगितलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना निम्रतनं या अफवांवर बोलताना स्पष्ट केलं होतं की, "लोक काही तरी बोलतच राहणार, म्हणून त्याकडं दुर्लक्ष करुन आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणं मी पसंत करेन."