ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2' ची प्रतीक्षा सुरू असताना अल्लू अर्जुनच्या पत्नीनं शेअर केलेल्या रोमँटिक फोटोमुळे इंटरनेटवर वादळ - ALLU ARJUN LATEST NEWS - ALLU ARJUN LATEST NEWS

ALLU ARJUN LATEST NEWS : अल्लू अर्जुनच्या नॉर्वेमधील कौटुंबिक सुट्टीतील रोमँटिक फोटो त्याची पत्नी स्नेहा रेड्डीनं शेअर केल्यानं चाहत्यांचं मन वेधून घेतलं आहे, तर त्यांची मुलगी अर्हा खेळकरपणे फोटोसाठी पोज देत आहे.

ALLU ARJUN LATEST NEWS
अल्लू अर्जुनआणि स्नेहा रेड्डी (llu Arjun, Allu Sneha Reddy (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 6:41 PM IST

मुंबई - ALLU ARJUN LATEST NEWS : अल्लू अर्जुन अलीकडे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याच्या बहुप्रतीक्षित 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि चित्रपटाभोवती बरीच चर्चा देखील सुरू आहे. दुसरं म्हणजे, 'पुष्पा 2' बद्दलच्या सर्व अनुमानांदरम्यान आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दरम्यान, अल्लू अर्जुन त्याच्या कुटुंबासह हॉलिडेचा आनंद लुटत आहे. या दरम्यान सोशल मीडियावर आलेल्या त्याच्या फोटोमुळे चाहते मोहित झाले आहेत. उत्कंठा वाढवत, अल्लू अर्जुनची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी यांनी अलीकडेच नॉर्वे, युरोपमधील त्यांच्या सुट्टीतील एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केले.

त्यांच्या नॉर्वेजियन सुट्टीतील फोटोमध्ये अल्लू स्नेहा रेड्डी यांनी एक सुंदर क्षण पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन तिचे चुंबन घेत आहे, तर त्यांची मुलगी अर्हा खेळकरपणे मागून फोटोसाठी पोज देत आहे. अल्लू कुटुंब नॉर्वेमध्ये त्यांचा वेळ घालवत आहे, विविध पर्यटन स्थळांचा शोध घेत आहे आणि स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवण करत आहे. ते लवकरच भारतात परततील अशी अपेक्षा आहे, त्यानंतर अल्लू अर्जुन 'पुष्पा: द रुल'चे शूटिंग पुन्हा सुरू करेल.

24 जुलै रोजी, स्नेहानं चाहत्यांना नॉर्वेमधील आणखी एक सुंदर फोटो दाखवून आनंद दिला, यामध्ये तिचे स्वतःचे, अल्लू अर्जुन आणि त्यांची मुलगी अर्हा यांच्या फोटोंचा समावेश होता. फोटो शेअर केल्यानंतर लगेचच त्याला सामंथा रुथ प्रभू, रकुल प्रीत आणि असंख्य चाहत्यांचे प्रेम मिळाले.

अलीकडे, अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर अल्लू अर्जुननं त्याच्या कुटुंबासह ब्रेक घेतल्याची चर्चा आहे. निषेध म्हणून त्याने केस छाटल्याच्याही अफवा होत्या. परंतु, 'पुष्पा' टीमनं स्पष्ट केलं की त्यांच्यात सर्व काही ठीक सुरू आहे.

दिग्दर्शक सुकुमार आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी यूएसला गेला आहे आणि या महिन्याच्या शेवटी 'पुष्पा 2' वर काम पुन्हा सुरू करण्याची त्यांची योजना आहे. ऑगस्टच्या अखेरीस हा चित्रपट पूर्ण करण्याचं निर्मात्यांचं लक्ष्य आहे.

सुरुवातीला हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता, 'पुष्पा: द रुल'च्या निर्मितीस विलंब झाल्यामुळं याचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात आलं आहे. नवीन रिलीजची तारीख आता 6 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना प्रमुख भूमिकेत आहेत.

'पुष्पा 2' व्यतिरिक्त, अल्लू अर्जुन एका आगामी प्रोजेक्टसाठी दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमारबरोबर काम करत आहे. त्याच्याकडे 'केजीएफ' दिग्दर्शक प्रशांत नील यांच्याबरोबरचाही एक चित्रपट आहे.

हेही वाचा -

  1. अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह युरोपमध्ये सुट्टीवर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - allu arjun
  2. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द रुल'च्या नॉन-थिएट्रिकल हक्कासाठी विक्रमी रक्कमेचा करार - Allu Arjun Pushpa 2
  3. 'पुष्पा 2' मुळं इतर सिनेमांचं रिलीज शेड्यूल फिसकटलं, 'पुष्पा'ची होणार 'छावा'शी टक्कर, रश्मिका मंदान्नाच्याही टेन्शनमध्ये वाढ - Pushpa 2 Vs Chhava

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.