ETV Bharat / entertainment

"प्रिये, दोन अर्जुन कशी सांभळशील?" म्हणत अल्लु अर्जुननं केला पत्नीला सवाल - ALLU ARJUN AT MADAME TUSSAUDS DUBAI - ALLU ARJUN AT MADAME TUSSAUDS DUBAI

अल्लू अर्जुनने दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयातील त्याच्या मेणाच्या पुतळ्याच्या लॉन्चिंगची झलक शेअर केली. सोशल मीडिया पोस्टमध्ये, त्याने गंमतीनं त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डीला, "ती दोन अर्जुन कशी सांभळशील?", असं विचारलं.

ALLU ARJUN AT MADAME TUSSAUDS DUBAI
अल्लु अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 4:51 PM IST

Updated : Mar 30, 2024, 9:07 AM IST

मुंबई - अल्लू अर्जुनच्या दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्याच्या वाढदिवसापूर्वीच ही ग्रेट भेट त्याला मिळाली आहे. दुबईतील कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबा बरोबर आलेल्या पुष्पा स्टार अल्लू अर्जुनने आनंदाने या कार्यक्रमाची झलक सोशल मीडियावर शेअर केली. एका पोस्टमध्ये, त्यानं खेळकरपणे त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी हिला विचारले की ती "दोन अर्जुन" हाताळू शकते का? स्वतःचा आणि त्याच्या मेणाच्या पुतळ्याच्या संदर्भात त्यानं ही मिश्कील विचारणा पत्नीला केली. अल्लु अर्जुनचा 8 एप्रिल रोजी 41 वा वाढदिवस साजरा होणार आहे.

ALLU ARJUN AT MADAME TUSSAUDS DUBAI
अल्लु अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण

इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये अल्लू अर्जुनने स्नेहाने घेतलेला सेल्फी शेअर केला आहे. स्नेहाने तो क्षण कॅमेऱ्यात कैद करताना तो त्याच्या मेणाच्या प्रतिकृतीच्या बाजूला अभिमानानं उभा राहिल्याचं दिसतंय. फोटो शेअर करताना अल्लू अर्जुनने लिहिले, "क्युटी! तू दोन अर्जुन हाताळू शकतेस का," त्यानंतर त्यानं इमोजी टाकलाय.

दुसऱ्या फोटोमध्ये अल्लू अर्जुन त्याची पत्नी आणि मुली बरोबर दिसत आहे, त्यांना प्रेमाने "खरा बट्टा बोमास" म्हणत आहे. हे शब्द आपल्याला नवखे वाटू शकतात पण 2020 मध्ये त्याच्या गाजलेल्या अला वैकुंठापुरमुलू या चित्रपटात बट्टा बोम्मा हे गाजलेलं गाणं होतं. नंतर या चित्रपटाचा हिंदीमध्ये शहजादा हा रिमेक बनवण्यात आला आणि यात कार्तिक आर्यननं अल्लु अर्जुनची भूमिका साकारली होती.

दुबईतील अल्लू अर्जुनच्या मेणाच्या पुतळ्याचा विचार करता यामध्ये त्याची 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील त्याची आयकॉनिक पोझ दिसत आहे. 2003 मध्ये त्याच्या फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता म्हणून कारकिर्दीला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या आठवणीचा भाग म्हणून मादाम तुसादमध्ये त्याचा हा पुतळा उभारण्यात आला आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या या अविस्मरणीय क्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अल्लू अर्जुन सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल' या सिक्वेलमध्ये गँगस्टरची भूमिका पुन्हा साकारणार आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. शिवाय, तो दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी प्रोजेक्टसाठीही काम करत आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार टी-सीरीज फिल्म्स अंतर्गत करत आहेत.

हेही वाचा -

  1. अल्लू अर्जुनच्या दुबईत मेणाच्या पुतळ्याचे लोकर्पण, पुष्पा स्टाईलनं चाहत्यांना केलं चकित - Allu Arjun wax statue
  2. ‘वहिनी नमस्कार’ म्हणताच आलिया भट्ट लाजून झाली गोरी मोरी, पाहा व्हिडिओ - Alia Bhatt at Mumbai airport
  3. ज्येष्ठ नागरिकांना युजलेस समजणाऱ्यांना चपराक देण्यासाठी महेश मांजरेकर आणताहेत 'जुनं फर्निचर' - Mahesh Manjrekars Juna Furniture

Last Updated : Mar 30, 2024, 9:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.