ETV Bharat / entertainment

'पुष्पा पुष्पा' गाण्यानं रचला इतिहास, 6 भाषांमध्ये 5 कोटी व्यूव्ह्ज मिळवणारं ठरलं पहिलं गाणं - allu arjun - ALLU ARJUN

Pushpa Pushpa song : 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामुळे 'पुष्पा-पुष्पा' हे गाणं हिट झालं आहे. या गाण्यानं यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे.

Pushpa Pushpa song
पुष्पा-पुष्पा गाणं ((Photo: Instagram - allu arjun))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 5:15 PM IST

मुंबई- Pushpa Pushpa song : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकतेच 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामधील 'पुष्पा-पुष्पा' पहिलं गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं तेलुगू आणि हिंदीसह 6 भाषांमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. 'पुष्पा-पुष्पा'मधील अल्लू अर्जुनचा डान्स हा खूप लोकप्रिय झाला आहे. अल्लूच्या तीन लोकप्रिय स्टेप्स आहेत. यामध्ये शूज, चहा आणि मोबाईल स्टेप्सचा देखील समावेश आहे. आता 'पुष्पा-पुष्पा' हे गाणं यूट्यूबवर धुमाकूळ इतिहास रचताना दिसत आहे.

'पुष्पा-पुष्पा' गाण्यानी रचला इतिहास : 'पुष्पा-पुष्पा' हे गाणं देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्येही हिट आहे. आता 'पुष्पा-पुष्पा' या गाण्यानं एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 'पुष्पा-पुष्पा' हे 6 भाषांमध्ये 50 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवणारे पहिलं गाणं ठरलं आहे. याशिवाय इंस्टाग्रामवर या गाण्यावर 1 लाखांहून अधिक रील्स बनवण्यात आल्या आहेत. आता या गाण्याच्या यशामुळे 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक आकडा नमूद केला आहे. 'पुष्पा-पुष्पा' गाणं तेलुगू आणि हिंदीबरोबर तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही प्रदर्शित झालं आहे. आता हे गाणं अनेकांना खूप आवडत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'पुष्पा 2 द रुल' कधी होणार प्रदर्शित : 'पुष्पा 2 द रुल'मधील 'पुष्पा-पुष्पा' गाण्याला संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिलंय. या गाण्याला तेलुगूमध्ये नकाश अझीझ, तामिळमध्ये दीपक ब्लू, हिंदीमध्ये मिका सिंग, कन्नडमध्ये विजय प्रकाश, मल्याळममध्ये रणजीत गोविंद आणि बंगालीमध्ये तिमिर बिस्वास यांनी गायलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर धमाका करत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट चालू वर्षाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2 द रुल' चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. गायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ चित्रपटासाठी साधली सुरेल हॅट्रिक - Singer Nandini Srikar
  2. नव्या फिल्मच्या शूटिंगसाठी शाहरुख खान सज्ज, आयपीएल संपताच सक्रिय होणार 'किंग' खान - Shah Rukh Khan New Movie
  3. मिसेस माही जान्हवी कपूरनं वानखेडे स्टेडियमवर केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्सला केलं चीअर्स - Mrs Mahi Janhvi Kapoor MI Vs KKR

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.