ETV Bharat / entertainment

आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Alia bhatt Vedang Raina - ALIA BHATT VEDANG RAINA

Jigra Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Jigra Trailer Out
जिगरा ट्रेलर आऊट ('जिगरा' (Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 12:46 PM IST

मुंबई - Jigra Trailer Out : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर आगामी चित्रपट 'जिगरा' रिलीजसाठी सज्ज आहे. आज, 26 सप्टेंबर रोजी निर्मात्यांनी 'जिगरा'चा ट्रेलर लॉन्च केला आहे. या चित्रपटामध्ये आपल्या भावाला वाचवण्यासाठी निघालेली आलिया भट्ट एका दमदार व्यक्तिरेखेत दिसत आहे. आलियाचं पात्र चाहत्यांना या चित्रपटात खूप आवडलं आहे. आलियानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'जिगरा'चा ट्रेलर शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं 'ऑल सेट?' असं लिहिलं आहे. 'जिगरा'मध्ये आलियानं 'सत्या'ची भूमिका साकारली आहे. सत्याच्या आयुष्यात एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे तिचा भाऊ अंकुर, ज्याच्यावर ती खूप प्रेम करते. या चित्रपटामध्ये वेदांगनं अंकुरची भूमिका साकारली आहे.

काय आहे 'जिगरा'च्या ट्रेलरमध्ये? : ट्रेलरमध्ये सत्याचा (आलिया) भाऊ अंकुर (वेदांग) ड्रग्जच्या प्रकरणात अडकतो. अंकुर बहिणीपासून दूर परदेशात राहतो. आपल्या भावाला वाचवण्यासाठी सत्याकडे फक्त तीन महिने आहेत. तो अनाथ असल्यानं त्याला त्याच्या नातेवाईकांकडून आशेचा किरण दिसत नाही. तेव्हा सत्या आपल्या भावाचा जीव वाचवण्याचं काम हाती घेते, सत्या प्रत्येक मोठ्या धोक्याशी लढताना या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवले गेले आहे. तिच्या डोळ्यात भीती नाही, ती फक्त भावावरील प्रेमामुळे कोणत्याही थराला जाताना ट्रेलरमध्ये दिसते.

'जिगरा' चित्रपटाबद्दल : 'जिगरा' 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आलियाचा चित्रपट राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'शी टक्कर बॉक्स ऑफिसवर देईल. 'जिगरा' चित्रपटामधील आलियाचा वेगळा अंदाज पाहण्यासाठी आता अनेकजण आतुर आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कामगिरी करू शकतो, अशी अपेक्षा सध्या केली जात आहे. 'जिगरा'च्या ट्रेलरवरून स्पष्ट होते की, याची कहाणी दमदार असणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट एक लेखका असल्याची दाखविण्यात येणार आहे. सध्या आलिया तिच्या या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन अंतर्गत करण जोहर, अपूर्व मेहता, आलिया भट्ट, शाहीन भट्ट आणि सौमेन मिश्रा यांनी केली आहेत. 'जिगरा' चित्रपटाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. आलिया भट्ट स्टारर 'जिगरा'मधील 'चल कुडिए' झालं प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - Alia Bhatt
  2. 'जिगरा'मधील आगामी ट्रॅकमध्ये आलिया भट्टबरोबर दिसणार दिलजीत दोसांझ, नवीन गाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र - Alia Bhatt
  3. आलिया भट्टनं नवीन पोस्टरसह 'जिगरा'च्या टीझर रिलीजची डेट केली जाहीर - ALIA BHATT

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.