ETV Bharat / entertainment

यशराजच्या महिला गुप्तहेर फ्रेंचायझीचा दिग्दर्शक ठरला, आलियासोबत शर्वरी वाघ साकारणार 'सुपर एजंट' - शर्वरी वाघ

YRF Spy Franchise :यशराज फिल्म्सच्या पहिल्या महिला गुप्तहेर फ्रेंचायझीचे दिग्दर्शन 'द रेल्वे मेन' फेम शिव रवैल करणार आहे. आगामी गुप्तहेर ड्रामा चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असेल तर शर्वरी वाघ देखील कलाकारांमध्ये सामील झाली आहे.

Spy Franchise
महिला गुप्तहेर फ्रेंचायझी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 4:46 PM IST

मुंबई - YRF Spy Franchise : यशराज फिल्म्सच्या गुप्तहेर विश्वातील आगामी भागाचं नेतृत्व आलिया भट्टनं करावं अशी निर्मात्यांची इच्छा आहे. या आगामी स्पाय थ्रिलरमध्ये शर्वरी वाघ दिसणार आहे. यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा यांनी महिला गुप्तहेर विश्वाच्या पदार्पणाच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिव रवैल याच्यावर सोपवली आहे.

महिला गुप्तहेराच्या मुख्य भूमिकेमुळे आलिया भट्ट आता सलमान खान, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या पंक्तीत सामील होणार आहे. ती या नव्या स्पाय थ्रिलरमध्ये भारतातील पहिली महिला एजंट बनणार आहे. यामध्ये शर्वरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'पठाण', 'वॉर' आणि 'टायगर'च्या यशानंतर यशराज फिल्म्स गुप्तचर विश्वातील आपल्या पहिल्या महिला लीड करत करत असलेल्या चित्रपटासाठी सज्ज झाले आहे.

दिग्दर्शक शिव रवैल यांने अलिकडेच 'द रेल्वे मेन' ही सनसनाटी मालिका तयार करुन आपली वेगळी ओळख दिग्दर्शनाच्या क्षेत्रात निर्माण केली आहे. माहितीनुसार आलिया आणि शर्वरी या चित्रपटात 'सुपर एजंट'च्या भूमिकेत दिसणार आहेत. गुप्तचर विश्व असलेल्या 'पठाण' आणि 'टायगर' चित्रपटामधून दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी हे चित्रपट नायकप्रधान ठरले होते. झोया अख्तरने फिल्म कम्पॅनियनसोबतच्या आधीच्या चर्चेत आलियासोबत यशराज फिल्म्स चित्रपट निर्मिती करत असल्याचे संकेत दिले होते. बिग बजेट चित्रपट आता नायिका प्रधान व्हावेत असा सल्लाही तिने दिला होता.

आलिया भट्टने 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' यांसारख्या चित्रपटांसाठी प्रशंसा मिळवल्यानंतर तिच्या या नव्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. गेल्या वर्षी आलियाने गॅल गॅडॉटसोबत 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूडच्या गुप्तचर चित्रपटात हॅकरची भूमिका केली होती. तिची भूमिका जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस आल्याने तिच्यावर कौतुकाच्या वर्षाव झाला होता.

शर्वरीसाठी हा गुप्तचर विश्वाचा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरणार आहे. याआधी यशराज फिल्म्सच्या 'बंटी और बबली 2' आणि कबीर खानच्या प्राइम व्हिडिओ सीरिज 'द फॉरगॉटन आर्मी'मध्ये दिसल्यानंतर तिच्या वाट्याला हा एक महत्त्वकांक्षी चित्रपट आला आहे.

लव्ह स्टोरी आणि बेताब यांसारख्या गाजलेल्या कामांसाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते राहुल रवैल यांचा मुलगा शिव रवैल या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. 1984 च्या भोपाळ वायू दुर्घटनेवर आधारित नेटफ्लिक्स मालिका द रेल्वे मेनचे त्याने दिग्दर्शन केल्यामुळे त्याची प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती.

हेही वाचा -

  1. निवडणुकीपूर्वी 'थलपथी' विजयचा राजकारणात प्रवेश, पक्षाचे नावही केले जाहीर
  2. पूनम पांडेच्या निधनावर कंगना रणौतने व्यक्त केला शोक
  3. अभिनेत्री पूनम पांडे्चं कॅन्सरमुळं निधन; इन्स्टाग्राम पोस्टमुळं चाहत्यांना धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.