ETV Bharat / entertainment

आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर 'अल्फा'चं शूटिंग काश्मीरमध्ये सुरू, फोटो व्हायरल - alia and sharvari pic viral - ALIA AND SHARVARI PIC VIRAL

Alia Bhatt and Sharvari Wagh : आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ अभिनीत 'अल्फा'चं शूटिंग काश्मीरमध्ये सुरू झालंय. आता शूटिंग सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Alia Bhatt and Sharvari Wagh
आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ (आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 1:16 PM IST

मुंबई - Alia Bhatt and Sharvari Wagh : अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांनी यशराज स्पाय युनिव्हर्सच्या 'अल्फा' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं दुसरं शेड्यूल काश्मीरच्या खोऱ्यात सुरू झालं आहे. 'अल्फा' चित्रपटाचं काश्मीरमध्ये 10 दिवसांचं शूट शेड्यूल असणार आहे. आलिया आणि शर्वरी नुकत्याच काश्मीरमध्ये पोहोचल्या आहेत. आता काश्मीरच्या खोऱ्यातून या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये दोघीही शूटिंगचा आनंद घेताना दिसत आहेत.

'अल्फा'चं शूटिंग काश्मीरमध्ये सुरू : शर्वरी वाघ आणि आलिया भट्टनं काश्मीर खोऱ्यातील हा फोटो इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये या दोघींनी एकमेकींचा हात धरून हार्टचा आकार बनवला आहे. फोटोत एक सुंदर धबधबा देखील दिसत आहे. शर्वरीनं काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे, तर आलिया ग्रे जॅकेटमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना आलिया आणि शर्वरीनं "लव्ह..अल्फा' असं लिहिलं आहे. आलिया आणि शर्वरीच्या फोटोवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेता विकी कौशललाही हा फोटो आवडला आहे. या फोटोला 13 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय अनेकजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

शर्वरी आणि आलियाचा फोटो व्हायरल : दरम्यान ऑस्कर विजेत्या चित्रपट निर्मात्या गुनीत मोंगा यांनीही या फोटोवर फायर इमोजी शेअर केले आहेत. आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी, या फोटोवर हॅन्ड क्लॅप, फायर आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत. यशराज बॅनरखाली चित्रित होत असलेल्या 'अल्फा' चित्रपटाचं दिग्दर्शन शिव रवैल हे करत आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन देखील असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र सध्या निर्मात्यांनी याबद्दल पुष्टी केलेली नाही. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ या स्टारकास्टची पुष्टी सध्या झालेली आहे. पुढील वर्षी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यशराज बॅनर हा पहिल्यांदाच महिला लीड ॲक्शन चित्रपट निर्मित करत आहे.

हेही वाचा :

  1. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर 'अल्फा'चं शूटिंग सुरू, पोस्ट व्हायरल - sharvari wagh and alia bhatt
  2. छोट्या मुलांसाठी आलिया भट्टनं 'पिक्चर बुक' केलं लॉन्च - Alia Bhatt
  3. बॉलिवूड आणि साऊथकडील सेलिब्रिटींनी 2024 च्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केल्या पोस्ट शेअर - World Environment Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.