ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारचा 'हा' चित्रपट 'स्त्री 2'ला देणार टक्कर, वाढदिवसानिमित्त करणार मोठी घोषणा - Akshay Kumar - AKSHAY KUMAR

Akshay Kumar: 'खट्टा मीठा' चित्रपटाच्या 14 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन एका हॉरर-कॉमेडीत एकत्र काम करणार आहेत. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर अक्षयनं मोशन पोस्टर शेअर करून त्याच्या वाढदिवशी एका खास चित्रपटाची घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत.

Akshay Kumar
अक्षय कुमार (अक्षय कुमार (ANI/Motion Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 7, 2024, 5:05 PM IST

मुंबई - Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं 7 सप्टेंबर रोजी शनिवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यानं त्याच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त नवीन चित्रपटाच्या घोषणेचे संकेत दिले आहेत. सध्या अक्षयनं आपल्या इंस्टाग्रामवर एक मोशन पोस्टर शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. पोस्टर शेअर करताना अक्षयनं कॅप्शन लिहिलं, 'गणपती बाप्पा मोरया! काही खास घोषणा करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो. तुम्हाला काहीतरी खास मिळणार आहे, पण ते माझ्या वाढदिवशी उघड होईल. बघत रहा." आता अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अक्षय वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांना काही विशेष देईल ? : अक्षय हा चित्रपट निर्माता प्रियदर्शनच्या सहकार्यानं एक हॉरर-कॉमेडी चित्रपट बनवणार आहे. याची घोषणा तो त्याच्या वाढदिवशी म्हणजेच 9 सप्टेंबरला करणार असल्याचं आता समजत आहे. अक्षय आणि प्रियदर्शननं 14 वर्षांपूर्वी 'खट्टा-मीठा' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या नवीन हॉरर-कॉमेडीबद्दल अद्याप बरेच तपशील समोर आलेले नाही, मात्र तरी, रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट काळ्या जादूवर आधारित असल्याचा अंदाज सध्या अनेकजण लावत आहे. या चित्रपटात अक्षय हा तीन अभिनेत्रींबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या वर्षाच्या अखेरीस या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

अक्षयबरोबर 'या' अभिनेत्री दिसणार : या चित्रपटाचा मुख्य भाग हैदराबाद, केरळ आणि श्रीलंकेतील जंगलात शूट केला जाणार आहे. या चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल पुढील वर्षी गुजरातमध्ये असेल. दरम्यान मोशन पोस्टरमध्ये अक्षयच्या पात्राची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. चित्रपटाची टीम अजूनही उर्वरित कास्टिंग फायनल करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कियारा अडवाणी, कीर्ती सुरेश आणि आलिया भट्ट या चित्रपटात एकत्र काम करू शकतात. तसेच अक्षयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा नुकताच रिलीज झालेला 'खेल खेल में' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही. या चित्रपटात त्याच्याबरोबर वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान या कलाकारांनी काम केलं होतं. तसेच अक्षयनं श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' मध्येही कॅमिओ केला आहे.

हेही वाचा :

  1. प्रियदर्शनबरोबर अक्षय कुमार त्याच्या वाढदिवशी हॉरर कॉमेडी चित्रपटाची करणार घोषणा - Akshay Kumar
  2. श्रद्धा कपूर आता हृतिक रोशनच्या घरची भाडेकरु , 'खिलाडी' आणि 'स्त्री' नवे शेजारी - shraddhas neighbour akshay kumar
  3. अक्षय कुमारनं मुंबईतल्या घराबाहेर गरजूंना केलं अन्नदान, चाहत्यांनी केलं कौतुक - Akshay Kumar video

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.