ETV Bharat / entertainment

'खेल खेल में'च्या शूटिंगसाठी अक्षय कुमार उदयपूरमध्ये दाखल, उत्साही चाहत्यांनी केले जोरदार स्वागत - फिल्म खेल खेल में

Hindi Film Khel Khel Mein: हिंदी चित्रपट खेल खेल में, बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गुरुवारी उदयपूरच्या दाबोक विमानतळावर पोहोचला, जिथे चाहत्यांनी त्याचे स्वागत केले.

Akshay Kumar
अक्षय कुमार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 3:44 PM IST

उदयपूर - Hindi Film Khel Khel Mein: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गुरुवारी उदयपूरला पोहोचला आहे. येथील दाबोक विमानतळावर पोहोचल्यावर या शहरातील चाहत्यांनी त्याचे उत्साहत स्वागत केले. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार त्याच्या आगामी 'खेल-खेल में' या चित्रपटाचे शूटिंग तलावांचे शहर असलेल्या उदयपूरमध्ये करणार आहे. त्यासाठीच अक्षय कुमार शूटिंगसाठी मुंबईहून उदयपूरला पोहोचला आहे. अरावलीच्या सुंदर टेकड्या आणि उदयपूरच्या इतर सुंदर लोकेशन्सवर या चित्रपटाचे काही प्रसंग चित्रीत करण्यात येणार आहेत.

उदयपूर विमानतळावर स्वागत - सुपरस्टार अक्षय कुमार उदयपूरच्या दाबोक विमानतळामधून बाहेर येताच, तेथे उपस्थित असलेल्या त्याच्या चाहत्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यादरम्यान अक्षय कुमारनेही उपस्थित सर्व लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. यानंतर अक्षय कुमार एका आलिशान कारमध्ये बसून उदयपूरमधील पंचतारांकित हॉटेलकडे रवाना झाला. 'खेल-खेल में' चित्रपटाच्या शूटिंगसाठी उदयपूरमध्ये अनेक लोकेशन्स निवडण्यात आले आहेत.

खेल खेल मेंच्या शूटिंगसाठी अक्षय कुमार उदयपूरमध्ये दाखल

याआधी सेलिब्रिटी फरदीन खान आणि अभिनेत्री वाणी कपूरही 'खेल-खेल में' चित्रपटाच्या शूटिंगसाठी उदयपूरला पोहोचले होते. अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' या चित्रपटाचे शूटिंग यापूर्वी लंडनमध्ये झाले आहे. या विनोदी चित्रपटाबाबत अक्षय कुमारने सोशल मीडियावर लिहिले होते, "जेव्हा कॅमेरा फिरतो, तेव्हा मला हसू आवरता येत नाही." या चित्रपटात तापसी पन्नू, वाणी कपूर, आदित्य सील आणि एमी विर्क यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 2024 मध्येच प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमार आणि फरदीन खान 16 वर्षानंतर एकत्र - अक्षय कुमार आणि फरदीन खान 2007 मध्ये आलेल्या 'हे बेबी' या कॉमेडी चित्रपटात एका चित्रपटाच अखेरचे दिसले होते. आता ही जोडी चित्रपटात पुन्हा एकत्र येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 16 वर्षानंतर ही हिट जोडी खेल खेल में या चित्रपटासाठी एकत्र आली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा 'हॅपी भाग जायेगी' आणि 'पती, पत्नी और वो' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा मुदस्सर अजीज यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा -

  1. इमरान हाश्मी 'डॉन 3'मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार का? सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
  2. रश्मिका मंदान्नाने मिलान फॅशन वीक 2024 पूर्वी दाखवली तिच्या ग्लॅम ग्राइंडची झलक
  3. भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसलानं कुमार आडनाव टाकेल काढून, टी-सीरीजला केलं अनफॉलो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.