ETV Bharat / entertainment

अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'औरों में कहाँ दम था'ची नवीन रिलीज डेट आली समोर - auron mein kahan dum tha - AURON MEIN KAHAN DUM THA

AMKDT New Release Date : अजय देवगण आणि तब्बू अभिनीत 'औरों में कहाँ दम था' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या नवीन रिलीज डेटची माहिती निर्मात्यांनी शेअर केली आहे.

AMKDT New Release Date
औरों में कहाँ दम था रिलीज डेट ((IMAGE- IANS/MOVIE POSTER))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 3:28 PM IST

मुंबई - AMKDT New Release Date : अभिनेता अजय देवगण आणि तब्बू आगामी 'औरों में कहाँ दम था' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची कहाणी प्रेमकथेवर आधारित असणार आहे. 'औरों में कहाँ दम था'चे दिग्दर्शन नीरज पांडे करत आहेत. या चित्रपटाची नवीन रिलीज डेट आज 6 जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी हा चित्रपट 5 जुलै 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार होता. नीरज पांडे आणि अजय देवगण यांनी सोशल मीडियावर 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. तसंच या चित्रपटाचं नवीन पोस्टरही रिलीज करण्यात आलय.

'औरों में कहाँ दम था' चित्रपट कधी होईल रिलीज : नीरज पांडे यांनी यापूर्वी 'अ वेन्सडे' आणि 'स्पेशल 26' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. याशिवाय त्यांनी 'धोनी : द अनटोल्ड स्टोरी' सारखा चित्रपटही बनवला आहे. आता ते पहिल्यांदाच एका प्रेमकहाणीतून आपली प्रतिभा दाखवणार आहेत. 'औरों में कहाँ दम था' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कहाणी मनाचा ठाव घेणारी आहे. 'औरों में कहाँ दम था'मध्ये 20 वर्षे वेगळे राहूनही तब्बू आणि अजय यांच्यातील प्रेम कसे टिकून राहते, याबद्दल दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा साउंडट्रॅक संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी तयार केला आहे.

अजय आणि तब्बूचं वर्कफ्रंट : 'औरों में कहाँ दम था' चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी सारखे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग मुंबईत झालंय. 'औरों में कहाँ दम था'चा रनटाईम हा 2 तास 30 मिनिटांचा आहे. या चित्रपटाकडून अजय देवगणला खूप अपेक्षा आहेत. दरम्यान अजय आणि तब्बूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'सिंघम अगेन', 'रेड 2', 'दे दे प्यार दे 2' आणि 'गोलमाल 5' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे तब्बू शेवटी 'क्रू' या चित्रपटामध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट ठरला होता. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन दिसली होती.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमारनं रणवीर सिंगला त्याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा - akshay wishes birthday ranveer
  2. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY
  3. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा 'संगीत सोहळा' संपन्न - sangeet ceremony

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.