ETV Bharat / entertainment

अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्या रायनं बच्चन कुटुंबासह येणं टाळलं, पुन्हा नव्या अटकळांना चालना - Aishwarya Rai Bachchan - AISHWARYA RAI BACHCHAN

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायने अनंत अंबानींच्या लग्नाला बच्चन कुटुंबापासून विभक्तपणे हजेरी लावली. यामुळे तिच्यात आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याच्या चर्चेनं पुन्हा जोर पकडला आहे.

Aishwarya Rai Skips Bachchan Family
अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Skips Bachchan Family Reunion at Anant-Radhika's Wedding (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 12:19 PM IST

मुंबई - Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नसंबंधात अडचण असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. या चर्चेला सध्या थोडा विराम मिळाला असताना अंबानी विवाह सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. 12 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात बच्चन कुटुंबीय हजर होते. मात्र त्याच्यात ऐश्वर्या सामील झाली नव्हती. या लग्नसमारंभाला ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या हिच्याबरोबर स्वतंत्रपणे हजर राहिली होती, तर अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, श्वेता, निखिल नंदा, नव्या नवेली आणि अगस्त्य एकत्र आले, सर्वांनी पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केला होता.

मुंबईत अनंत-राधिकाच्या भव्य विवाह सोहळ्यात ऐश्वर्या पोहोचली आणि तिची मुलगी आराध्याबरोबर लग्नात मिरवली. भरतकाम केलेल्या श्रगसह जोडलेल्या लाल अनारकली सूटमध्ये ती आकर्षक दिसत होती. ऐश्वर्याच्या सौंदर्याकडे आणि तिच्या उपस्थितीकडे लक्ष वेधलेल्या उपस्थितांना ती अभिषेक बच्चन बरोबर नसल्याचं जाणवलं. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसले.

अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Skips Bachchan Family Reunion at Anant-Radhika's Wedding (ANI))

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या जोडप्याच्या नातेसंबंधाच्या स्थितीबद्दल नेटिझन्स उत्सुक असताना, अनंत-राधिकाच्या लग्नातील व्हायरल व्हिडिओमध्ये ऐश्वर्या आणि सदाबहार भिनेत्री रेखा यांच्यातील एक स्पष्ट क्षण कॅप्चर केला. यामुळे सोशल मीडियावर आणखी उत्सुकता निर्माण झाली.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांनी आपल्यातील नात्याबद्दल अलिकडे सार्वजनिक चर्चा केलेली नाही. आपल्यामध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं ते दाखवत आले आहेत. या जोडप्याने 20 एप्रिल 2007 रोजी एकत्र आयुष्याला आरंभ केला होता. या दांपत्याला 16 नोव्हेंबर 2011 रोजी आराध्या हे कन्यारत्न प्राप्त झालं होतं.

हेही वाचा

  1. AbhiAsh Marriage Anniversary : एकमेकांना साथ देत अभिषेक ऐश्वर्यानी पार केली विवाहित जीवनाची 16वर्षे...
  2. Aaradhya Bachchan : आराध्या बच्चनने खोट्या बातम्यांविरोधात ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा; न्यायालयाने गुगलला बजाविले समन्स
  3. कान्स 2024च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा, मुलगी आराध्यानंही जिंकली मनं - Cannes 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.