ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या नारकरचा पती अविनाश यांनी दिवाळीसाठी करंज्या बनवल्या, व्हिडिओ व्हायरल - AVINASH NARKAR

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरचा पती अविनाश यांनी दिवाळीसाठी करंज्या बनविल्या आहेत. आता त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

AVINASH NARKAR
अविनाश नारकर (Aishwarya Narkar - (Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 29, 2024, 1:15 PM IST

मुंबई - देशभरात सर्वत्र दिवाळीची लगभग सुरू आहे, हा सण मोठ्या आनंदानं आणि जल्लोषात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये अनेकांकडे फराळ हा बनविल्या जात असतो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न असते. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटी देखील या दिवसांमध्ये आपल्या कुटुंबरोबर विशेष वेळ घालवत असतात. शूटिंगमधून ब्रेक घेऊन सेलिब्रिटी दिवाळीचा सण कुटुंबीयांबरोबर साजरा करत असतात. आता काही मराठी कलाकरांनी फराळ बनवायला सुरुवात केली आहे. मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरच्या घरी दिवाळीचं फराळ बनविल्या जात आहे.

ऐश्वर्या नारकर यांच्या पतीनं केल्या दिवाळीसाठी करंज्या : ऐश्वर्या सध्या एका मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. यानंतर तिचा पती अविनाश नारकर यांनी फराळ बनवण्याची सुरुवात केली आहे. अविनाश यांनी सोशल मीडियावर करंज्या बनवतानाचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते स्वत:च्या हातानं करंज्या बनवून तळताना दिसत आहे. अविनाश यांनी या व्हिडिओच्या पोस्टवर लिहिलं, 'चला चला या या या... सगळयांनी फराळाला या....!! मी,ऐश्वर्या आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या मंगलमय , तेजोमय दिवाळी आणि नवीन वर्षांच्या खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा....!!' आता अविनाश यांच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

चाहत्यांनी केलं कौतुक : दरम्यान अविनाश नारकर यांचे पाककौशल्य पाहून यूजर्स भारावून गेले आहेत. अविनाश यांच्या एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'खूप छान आताच खावी वाटते करंजी... तुझ्या हातची नक्कीच गोड असणार.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'शुभ दिपावली, ह्या अशा व्हिडीओमुळे अनेकांच्या संसारात भांडणे लागू शकतात.' आणखी एकानं लिहिलं, 'अविनाश सर पत्ता सांगा येतेच फराळाला.' याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर इमोजी पोस्ट करून अविनाश यांचं कौतुक करत आहेत. दरम्यान अविनाश नारकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट, मालिका, मराठी नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचा नुकताच 'डंका हरिनामाचा' हा चित्रपट आला होता. याशिवाय ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते आपल्या पत्नीबरोबर डान्सचे रील्स शेअर करत असतात. त्यांचे रिल्स चाहत्यांना खूप पसंत येते.

हेही वाचा :

  1. ऐश्वर्या नारकरनं पती अविनाशला ट्रोल करणाऱ्याला दिलं सनसनीत उत्तर, वाचा बातमी सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.