ETV Bharat / entertainment

नव्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर कडक फौजफाटा, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

सलमान खानकडे 5 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर आला होता. त्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

THREAT TO SALMAN KHAN
सलमानच्या घराबाहेर पोलीस तैनात (Photo IANS / ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 18, 2024, 3:56 PM IST

मुंबई - अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आणि 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी झाल्यानंतर त्याच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ताज्या घडामोडीनुसार सलमानच्या घरासमोर तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. नव्या धमकीनंतर तेथे चोवीस तास सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एक धमकीचा संदेश आला होता, ज्यामध्ये अभिनेता सलमान खानने "लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी" 5 कोटी रुपयांची मागणी केली होती.

मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळ असल्याचा दावा केला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास सलमानचा जीव धोक्यात घालण्याचा दावाही करण्यात आला आहे. मेसेज पाठवणाऱ्यानं म्हटलंय की, या मेसेजला हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचे असेल तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल." राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सलमानला धमकीची ही घटना घडली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या भयानक धमकी मागे कोण आहे याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत.

अलीकडेच महाराष्ट्र पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला हरियाणातील पानिपत येथून अटक केली आहे. हा संशयीत व्यक्ती सलमान खानच्या नवी मुंबईतील पनवेलजवळील फार्महाऊसच्या रेकीमध्ये सामील झाला होता. अलीकडेच, पंजाब आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त कारवाईत, संशयित सुखबीर बलबीर सिंग उर्फ ​​सुखा याला पानिपतच्या सेक्टर-29 पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली.

एप्रिलच्या सुरुवातीला मुंबईतील त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्यानंतर ही घटना घडली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. 14 एप्रिल रोजी वांद्रे उपनगरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की अशा गुन्ह्यांना जबाबदार असलेल्यांना कायद्याच्या पूर्ण ताकदीला सामोरे जावे लागेल. "कोणालाही सोडले जाणार नाही. दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असे शिंदे यांनी जाहीर केले आहे. तपास सुरू असताना, मुंबई गुन्हे शाखेने सिद्दीकीच्या हत्येशी संबंधित चार जणांना अटक केली आहे, तर तिघे अजूनही फरार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.