ETV Bharat / entertainment

राम चरणानंतर 'गेम चेंजर'मधील कियारा अडवाणीचा लूक लीक - Kiara Advani look

Kiara Advani Look From Game Changer Leaked : 'गेम चेंजर' या चित्रपटातील अभिनेता राम चरणच्या लूकनंतर आता कियारा अडवाणीचा लूकही लीक झाला आहे. विशाखापट्टणममधील शूटिंगदरम्यान साध्या साडीत कियारा लूक खूप सुंदर दिसत आहे.

Kiara Advani Look From Game Changer Leaked
कियारा अडवाणीचं गेम चेंजरमधील कियारा अडवाणीचा लूक लीक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 5:26 PM IST

मुंबई - Kiara Advani Look From Game Changer Leaked : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता राम चरणचा बहुप्रतीक्षित आगामी 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. कियारनं याआधी साऊथ चित्रपट 'विनया विधेया रामा' आणि 'भरत अणे नेणू'मध्ये काम केलं आहे. आता ती पुन्हा एकदा 'गेम चेंजर' या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सध्या 'गेम चेंजर' चित्रपटाच्या अपडेट्सवर प्रेक्षकांची नजरा खिळलेल्या आहेत. 'गेम चेंजर'मधून राम चरणचा लूक लीक झाल्यानंतर आता कियारा अडवाणीची या चित्रपटामधील झलक समोर आली आहे, ज्यामध्ये ती साध्या साडीत दिसत आहे.

'गेम चेंजर'मधील कियारा अडवाणीचं सिंपल लूक : कियारा अडवाणीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कियारा अडवाणी तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी विशाखापट्टणममध्ये फिरताना दिसत आहेत. फोटोत कियारा अडवाणीनं क्रीम रंगाच्या ब्लाउजसह सोनेरी बॉर्डर असलेली गडद जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिनं कानातले आणि बिंदी देखील घातली आहे. याशिवाय तिनं पोनीटेलमध्ये केस बांधलेले आहेत. या सिंपल लूकमध्ये कियारा खूपच क्यूट दिसत आहे. 'गेम चेंजर' हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे.

'गेम चेंजर' चित्रपटामधील स्टार कास्ट : 'गेम चेंजर' चित्रपटाचं दिग्दर्शन एस. शंकर यांनी केलं असून त्यांनी तेलुगू दिग्दर्शनात पदार्पण केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर' चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. राम चरणबरोबर, कियारा अडवाणी, अंजली, जयराम, सुनील, समुथिरकणी, नवीन चंद्र, नस्सर आणि इतर कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'गेम चेंजर' हा चित्रपट सप्टेंबर 2024मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी ती 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनबरोबर दिसली होती. तिचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप हिट झाला होता. आता पुढं ती फरहान अख्तरच्या 'डॉन 3'मध्ये रणवीर सिंगबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Allu Arjun Viral Video : अल्लू अर्जुननं भावूक चाहत्याचं केलं सांत्वन , व्हिडिओ व्हायरल
  2. एड शरीनसाठीच्या स्टार स्टडेड पार्टीत हृतिक रोशनची सबा आझादसह हजेरी
  3. Akshay and Tiger Shroff : पाहा, 'बडे मियाँ' अक्षयची 'छोटे मियाँ' टायगरशी 'अशी ही बनवाबनवी' !!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.