मुंबई - Prathamesh Laghate and Adah sharma : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रथमेश लघाटेनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्यानं शेअर केलेली व्हिडिओ क्लिप आता सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये असं नेमक काय आहे, की ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. प्रथमेश लघाटे उत्कृष्ट गायक आहे. त्यानं अनेक प्रकारची गाणी गायली आहेत. प्रथमेशचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. आता प्रथमेशनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं ऐकून प्रथमेश देखील थक्क झाला आहे.
प्रथमेश लघाटेनं शेअर केला अदाचा व्हिडिओ : 2021मध्ये प्रथमेश लघाटेचं ‘अंतरी माझ्या श्रीराम’ हे भक्तीगीत प्रचंड गाजलं होतं. आता हेच गाणं अदा शर्मानं गायलं आहे. अदानं तिचा हा व्हिडिओ, तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. अदाचा व्हिडिओ प्रथमेशला खूप आवडला. अदा ही नेहमीच तिच्या गाण्याचे आणि डान्सचे व्हिडिओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिचे व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. दरम्यान प्रथमेशनं अदाचा व्हिडिओ शेअर करत मूळ भक्तीगीताची लिंक दिली आहे. याशिवाय त्यानं या पोस्टमध्ये अदाला टॅग करून फुल आणि हात जोडलेला इमोजी शेअर केला आहे.
प्रथमेश लघाटेचं भक्तीगीत : अदाचा हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक लोकांना आवडला आहे. याशिवाय प्रथमेशच्या या भक्तीगीताला युट्यूबवर 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच या गाण्याला 22 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. दरम्यान अदाबद्दल बोलायचं झालं तर तिचा 2023मध्ये प्रदर्शित झालेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. आता शेवटी ती 'बस्तर द नक्सल स्टोरी' मध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. आता पुढे ती 'क्वेश्चन मार्क' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :