मुंबई - Adah Sharma : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं वांद्रे येथील अपार्टमेंट भाड्यानं घेतल्यानं अभिनेत्री अदा शर्मा बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत होती. ऑक्टोबर 2023 मध्ये अपार्टमेंटसाठी तिनं लीजवर स्वाक्षरी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला ती तिच्या आई आजीबरोबर राहू लागली. सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान अदानं तिच्या नवीन घराबद्दल सांगितलं. एका पत्रकारानं अदा शर्माला विचारलं, "तुम्ही दिग्गज अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं घर भाड्यानं घेतलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना अदा म्हणाली, "मी ते भाड्यानं घेतलं आहे." यानंतर ती गमतीनं म्हणते, "द केरळ स्टोरी'ची 300 कोटींची कमाई माझी नाही. मी भाड्यानं राहाते. यावेळी तिनं सुशांत सिंहबद्दलही खुलासा करत म्हटलं, "हे श्रीमान लालवाणींचं घर आहे. सुशांतही भाड्यानं राहात होता."
अदा शर्माच्या नवीन घराबद्दल : पत्रकार परिषदेत आपल्या नवीन घराविषयी बोलताना अदानं सांगितलं, "नोकरी न करणाऱ्या माझ्या आईला आर्थिक पाठबळ नाही. पण ती खूप छान स्वयंपाक करते. मी माझ्या आई आणि आजीबरोबर नवीन घरात राहाते. खरे तर घर माझे नाही, हे लालवानी यांचं आहे. मला वाटतं की ते दक्षिण आफ्रिकेत आहेत. मी आयुष्यभर पाली हिल (वांद्रे) येथे एका घरात राहिले. मी पहिल्यांदाच तिथून बाहेर पडले. माझे व्हायब्स खूप संवेदनशील आहेत. हे ठिकाण मला सकारात्मक वातावरण देते. माझी केरळ आणि मुंबईतील घरे झाडांनी वेढलेली आहेत. इतकंच नाही तर पक्षी आणि प्राण्यासाठी खाद्यपदार्थ मी ठेवते. मला सुंदर दृश्ये असलेलं घर आणि पक्ष्यांना खायला देण्यासाठी पुरेशी जागा हवी होती."
अदाच्या घरात फर्निचर नाही : चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी गंमतीनं यावेळी म्हटलं "अदाच्या घरात एकही फर्निचर नाही. यावर अदा म्हणते, "माझ्या आधीच्या घरातही फर्निचर नव्हतं." विक्रम आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, "मला नाही माहीत याचा अर्थ काय आहे." यानंतर अदा हसत हसत म्हणते, "मुंबईत आपण प्रत्येक गोष्टीसाठी पैसे देत असतो, मी एवढ्या सुंदर घरात राहता असेल तर, मला आरामात फिरायला आवडेल. त्यामुळे माझ्या घरात फर्निचर नाही." सुपरहिट 'द केरला स्टोरी'मधून प्रसिद्धी झोतात आलेली अदा शर्मा विक्रम भट्ट दिग्दर्शित 'तुमको मेरी कसम' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. 'तुमको मेरी कसम' चित्रपटात अदाबरोबर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, ईशा देओल आणि इश्वाक सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट अजय मुर्डियाच्या इंदिरा एंटरटेनमेंटद्वारे निर्मित केला गेला आहे.
हेही वाचा :