ETV Bharat / entertainment

सुशांत सिंहनं आत्महत्या केलेल्या घरात शिफ्ट झाली अदा शर्मा - Adah Sharma - ADAH SHARMA

Adah Sharma : 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरी शिफ्ट झाली आहे. तिनं सुशांतच्या घरात आता खूप काही बदल केला आहे.

Adah Sharma
अदा शर्मा (अदा शर्मा (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 2:59 PM IST

मुंबई - Adah Sharma : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचं मुंबईतील घर सुनसान झालं होतं. 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा यात राहण्यासाठी येणार असल्याचा अनेकजण अंदाज लावत होते. यामुळे अदा काही दिवसांपासून खूप चर्चेत होती. आता अदा शर्मा सुशांतच्या घरी स्थायिक झाल्याची पुष्टी झाली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून अदा सुशांतच्या रिकाम्या घरात शिफ्ट झाली होती. एका मुलाखतीत अदानं सांगितलं की, तिला सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील घरी न राहण्याचा अनेकांनी सल्ला दिला होता. तिनं पुढं म्हटलं, "मी चार महिन्यापूर्वी येथे शिफ्ट झाली आहे, जेव्हा मी माझ्या कामातून मुक्त झाले तेव्हा मी येथे राहायला आले."

अदा शर्मानं घेतलं सुशांत सिंहचं घर भाड्यानं : यानंतर तिनं म्हटलं, "मी माझं संपूर्ण आयुष्य पाली हिलमधील एका घरात घालवलं होतं आणि मी पहिल्यांदाच तिथून बाहेर पडली आहे, येथे मला सकारात्मक व्हायब्स मिळतात, त्यामुळे मला एक घर हवं आहे. मला असं घर पाहिजे होतं जिथं निसर्ग मला आलिंगन देईल." अदा शर्मानं पाच वर्षांसाठी हे घर भाड्यानं घेतलं आहे. दरम्यान अदानं या घरात खूप पैसा गुंतवलाआहे. तिनं मंदिर बनवलं आहे. मंदिर खालच्या मजल्यावर आहे आणि ती वरच्या मजल्यावर राहणार आहे. एका रुममध्ये म्युझिक सिस्टम असेल, जिथे ती डान्स करेल. तिनं टेरेसला झाडं आणि वनस्पतींच्या हिरवळीनं सजवलं आहे.

अदा शर्माचं वर्कफ्रंट : अदा शर्मानं घरातील फर्निचरवर फार काही काम केलेलं नाही. ती जमिनीवर झोपणार आणि देसी स्टाईलमध्ये जमिनीवर बसून जेवणही करणार आहे. अदानं ऑगस्ट 2023 मध्ये हे घर बुक करण्याचा करार केला होता. रिपोर्ट्सनुसार, सुशांत या घराचं भाडं म्हणून 4.5 लाख रुपये देत होता. सुशांतच्या निधनानंतर या घरात कुठलाहीभाडेकरू या घरात राहायला आलेला नाही. दरम्यान अदा शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं ती नुकतीच 'बस्तर: द नक्सल स्टोरी ' या चित्रपटामध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर काही खास कमाई करू शकलेला नाही. आता ती पुढं 'क्वेश्चन मार्क' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. किशोरवयीन मुलांच्या संवेदनशील कथेवरील 'अनन्या व्हॉट इफ' चित्रपट थेट यूट्यूबवर प्रदर्शित - Ananya What If
  2. रवीना टंडन पार्किंग प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया, केली पोस्ट शेअर - Kangana Ranaut
  3. रियल मैड्रिड यूईएफए चॅम्पियन्स लीग जिंकल्यानंतर कार्तिक आर्यननं आनंदानं स्टेडियममध्ये मारल्या उड्या - Kartik Aaryan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.