मुंबई - Tabu announced the wrap up of the crew shoot : अखेरीस अभिनेत्री तब्बूने 'क्रू'चे शूटिंग पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी तिनं अतिशय उत्साहात दिली आहे. रविवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर तब्बूने केकसह रॅप-अपची घोषणा केली आणि त्याला कॅप्शन दिले, "रॅप टाइम...केक टाइम. क्रू."
नुकतेच निर्मात्यांनी 'क्रू' च्या टीझरचे लॉन्चिंग केले आणि ते सोशल मीडियावर आधीपासूनच ट्रेंडिंग सुरू झाले आहे. चित्रपटात अभिनेत्री तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत. फ्लाइटसाठी असलेल्या शेंगदाण्यांचे बॉक्स चोरण्यापासून ते भरपूर पैसे कमावण्याचे नियोजन आणि ग्लॅम कोशिंट वाढवण्यापर्यंत, हे त्रिकूट धमाल उडवताना दिसणार आहे. तब्बू, करीना आणि क्रितीला पहिल्यांदाच एकत्रीत कॉमेडी करताना पाहणे रंजक असणार आहे.
टीझरची सुरुवात व्हॉईसओव्हरने होते, ज्यामुळे प्रवाशांना सूचना करते की त्याच्या एअर होस्टेसना हाताळणे खूप कठीण आहे. यावेळी तब्बूच्या संवादामध्ये दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांनी देखील टीझरमध्ये त्यांचे डोळे मिचकावलेले दिसतात. टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे त्यांच्या प्रतिक्रियावरुन वाटत आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढीस लागणार आहे.
टीझरची लिंक शेअर करताना, करिनाने इंस्टाग्रामवर लिहिले, "कुर्सी की पेटी बांध लो. क्रू टीझर आऊट." हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क बॅनरखाली बनवला आहे. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
यापूर्वी हा 22 मार्च रोजी रिलीज होणार होता परंतु निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 'क्रू' ही तीन महिलांची कथा आहे आणि या तिघीही हसत-खेळत धमाल मस्ती करताना दिसतात. या चित्रपटाची अनोखी कथा एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. पहिल्यांदाच यातून या क्षेत्रातील अनेक गोष्टी नव्याने रंजक माध्यमातून कळतील. 2018 च्या कॉमेडी 'वीरे दी वेडिंग' नंतर हा चित्रपट एकता आर कपूर आणि रिया कपूर यांच्या निर्मितीतून तयार होणारा हा दुसरा चित्रपट आहे.
हेही वाचा -