ETV Bharat / entertainment

अभिनेत्री मलाबिकाच्या पार्थिवावर ममदानी ट्रस्टनं केले अंत्यसंस्कार, मृत्यूचे नेमके कारण काय? - Actress Noor Malabika Death

Actress Noor Malabika Death Case : अभिनेत्री नूर मलाबिका दास हिचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्यामुळं त्यांनी पोलिसांना बोलाविल्यानंतर अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती समोर आली. पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर आलीय.

Actress Noor Malabika Death Case
अभिनेत्री नूर मालाबिका मृत्यू (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 7:53 AM IST

मुंबई Actress Noor Malabika Death Case : अभिनेत्री काजोलची ‘द ट्रायल’ मधील सहकलाकार, माजी हवाई सुंदरी आणि अभिनेत्री नूर मालाबिका दासचा मृतदेह मुंबईतील अपार्टमेंटमध्ये आढळला. पोलिसांनी लोखंडवाला येथील फ्लॅटमधून तिचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून अहवाल राखून ठेवण्यात आलाय. तसंच व्हिसेरासाठी नमुने पाठवण्यात आल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी दिली आहे.

काही दिवसांपासून होती तणावात : मूळची आसाममधील रहिवासी असलेली 37 वर्षीय नूर ही कामाच्या शोधत मुंबईत आली होती. तिनं सुरुवातीला हवाई सुंदरी म्हणून काम केलं. त्यानंतर तिनं मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. ती काही वेब शोमध्ये देखील झळकली. 'द ट्रायल' या वेबसिरीजमध्ये नूरनं अभिनेत्री काजोलसोबत काम केलं होतं. तर वयोवृद्ध आई-वडिलांसोबत लोखंडवाला येथे राहात असलेली दास ही गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणावात असल्याचं बोललं जातंय.

अभिनेत्री नूर मलाबिका दासनं केली आत्महत्या? : मे महिन्याच्या अखेरीस नूरचे आई-वडील आसामला गेले होते. त्यामुळं काही दिवसांपासून ती एकटीच होती. मात्र, दास हिच्या फ्लॅटमधून कुजलेला वास येत असल्यानं शेजाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. आत गेल्यावर पोलिसांना नूरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घराची झडती घेत नूरची औषधं, मोबाईल फोन आणि डायरी जप्त केली. तसंच तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला. त्यानंतर दासच्या पार्थिवावर ममदानी ट्रस्टकडून शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात दासनं नैराश्यातून आत्महत्या केल्याचं समोर आलंय.

याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आलाय. दासच्या मृत्यूचं नेमकं कारण अंतिम शवविच्छेदन अहवालातून समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलंय. यासंदर्भात ममदानी ट्रस्टचे खजिनदार इकबाल ममदानी म्हणाले की, "ओशिवरा पोलिसांकडून आम्हाला शनिवारी एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत माहिती देण्यात आली. अभिनेत्रीचे आई-वडील आसाममधून मुंबईत येण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांचे मित्र आलोकनाथ पाठक यांच्या मदतीनं ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले."

आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील अथवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर कोणीतरी नेहमी ऐकण्यासाठी उपलब्ध असते. तुम्ही स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची हेल्पलाइन - 9152987821 वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध आहे.

हेही वाचा -

  1. अभिनेत्री नूर मालविका दासचा फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह, पोलीस चौकशी सुरू - Noor Malabika Das Dies
  2. मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईट नोट - IAS officer daughter suicide
  3. टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामच्या मृत्यूनंतर कथित बॉयफ्रेंड चंद्रकांत उर्फ चंदूनं केली आत्महत्या - CHANDU DIES BY SUICIDE

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.