ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार नवीन वर्ष 2025 साजरे करण्यासाठी कुटुंबासह जयपूरला पोहोचला, कॅमेऱ्यात कैद झाले फोटो - ACTOR AKSHAY KUMAR

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह जयपूरला पोहोचला आहे.

akshay kumar
अक्षय कुमार (अक्षय कुमार (ETV Bharat Jaipur))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 31, 2024, 11:16 AM IST

जयपूर : पिंक सिटी जयपूर हे नववर्ष सेलिब्रेशनचे डेस्टिनेशन व्हेन्यू बनले आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक जयपूरला आता पोहोचत आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोमवारी कुटुंबासह जयपूरला गेला. यावेळी अक्षय कुमार नवीन वर्ष जयपूरमध्ये सेलिब्रेट करणार आहे. अक्षय कुमार जयपूरच्या दिल्ली रोडवरील आमेर भागातील हॉटेल लीला पॅलेसमध्ये राहणार असल्याचं समजत आहे. अक्षय हा आपल्या कुटुंबाबरोबर लीला पॅलेसमध्ये खास पद्धतीनं नवीन वर्ष साजरे करणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सोमवारी संध्याकाळी जयपूर विमानतळावर स्पॉट झाला. अक्षयला जयपूर विमानतळावर पाहिल्यानंतर तिथे मोठ्या संख्येनं चाहते जमले.

अक्षय कुमार करणार नवीन वर्ष पिंक सिटीमध्ये साजरे : विमानतळावरून बाहेर पडताना लोकांनी अक्षयचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपले. जयपूर विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था असताना अक्षय हा कारमध्ये बसला आणि हॉटेल लीला पॅलेसकडे रवाना झाला. नववर्षच्या सेलिब्रेशनसाठी अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांबरोबर दिल्ली रोडवरील हॉटेल लीला पॅलेसमध्ये थांबत आहे. या हॉटेलमध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या कुटुंबासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. जयपूरमध्ये पर्यटकांची वर्दळ जास्त असल्यानं शहरातील हॉटेल्सही हाऊसफुल्ल आहेत. आता पिंक सिटीत सर्वच पर्यटन स्थळांवर, पर्यटकांची गर्दी होत आहे.

अक्षय कुमारचं वर्कफ्रंट : तसेच शहरात पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात असल्यानं वाहतुकीची कोंडी होत आहे. दरम्यान जयपूर वाहतूक पोलिसांकडून, वाहतूक व्यवस्थेबाबत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आमेरमध्ये देखील एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. आता काही कलाकार राजस्थानमध्ये नववर्ष सेलिब्रेशन करण्यासाठी आज जाऊ शकतात, असा अंदाज आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जगभरातील लोक खूप उत्सुक आहेत. दरम्यान अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'स्कायफोर्स', 'हाऊसफुल्ल 5' , 'जॉली एलएलबी 3', 'वेलकम 3', 'भुत बंगला', 'हेराफेरी 3',' राउडी राठौर 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चे शूटिंग सुरू, हॉरर कॉमेडी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
  2. अजय देवगणनं अक्षय कुमार अभिनीत त्याच्या पुढील दिग्दर्शकीय चित्रपटाची केली घोषणा, वाचा सविस्तर
  3. अक्षय कुमारशिवाय 'सिंग इज किंग'चा सीक्वेल बनू शकत नाही, जाणून घ्या कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.