ETV Bharat / entertainment

'शराबी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार अभिषेक कपूर, केली घोषणा - शराबीचं दिग्दर्शन करणार

Abhishek Kapoor : दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी आगामी चित्रपट 'शराबी'ची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी दिसणार आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 5:21 PM IST

मुंबई - Abhishek Kapoor : दिग्दर्शक अभिषेक कपूरनं हिंदी चित्रपटसृष्टीत इंडस्ट्रीत एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ते एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी या चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. अलीकडेच अमन आणि राशा अभिनीत चित्रपटाच्या शीर्षकांची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं असून 'शराबी' असं या चित्रपटाचं नाव आहे. याआधी अभिषेक कपूरनं सारा अली खानलाही 'केदारनाथ'मधून लॉन्च केलं होतं. अभिषेक कपूर त्याच्या आगामी चित्रपटावर सध्या काम करत आहे. दरम्यान दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी 'शराबी' नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

अभिषेक कपूर पुन्हा एकदा करणार कम बॅक : या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि डायना पेंटी देखील दिसणार असल्याचं समजत आहे. पहिल्यांदा अजय आणि डायना या चित्रपटातून एकत्र दिसत आहेत. रॉक ऑन!!', 'काई पो छे!', 'केदारनाथ', आणि 'चंदीगढ करे आशिकी' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिषेक कपूर यांनी आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवली आहे. अभिषेक कपूरनं कायमचं हटके कथा या प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. तब्बल चार वर्षांच्या संयमानं पुन्हा एकदा अभिषेक कपूर बॉलिवूडमध्ये कम बॅक करत आहे. 'शराबी'चं कुतूहल वाढत असताना हा चित्रपट 1984च्या अमिताभ बच्चन स्टाररच्या संभाव्य कनेक्शनचा काहीतरी संकेत देत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

शराबी चित्रपटाची घोषणा : सोशल मीडिया पोस्टमध्ये अभिषेक कपूरनं म्हटलं, ''मी दारू सोडल्यापासून जवळपास 4 वर्षे झाली आहेत. माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण आणि महत्त्वाचा निर्णय होता. देव जाणतो नाती नष्ट होतात आणि यातून काही संधी गमावल्या जातात. तरुणाईत असताना या गोष्टीची जाणीव झाली नाही. जेव्हा जाणीव होते, तेव्हा बदल करणे महत्त्वाचे असते. कधी कधी पुन्हा उठण्यासाठी स्वतःलाच कष्ट करावे लागतात." अभिषेक कपूर यांनी एक शीर्षक नसलेल्या चित्रपटाच्या शूटिंगचा टप्पा संपूर्ण केला असून सोबतीचं 'शराबी'ची घोषणा करून प्रेक्षकाला एक भेट दिली आहे.

हेही वाचा :

  1. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना
  2. सुशांत सिंगची बहिणीसह रिया चक्रवर्तीला एसएसआरची आली आठवण, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट
  3. सानिया मिर्झाच्या चाहत्यांकडून शोएब मलिक ट्रोल, तिसरं लग्न केल्यानं सुनावलं!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.