ETV Bharat / entertainment

रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लानं त्याच्या मुलींचे गोंडस फोटो केले शेअर - रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला

Rubina And Abhinav : रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे सध्या पालकत्व एन्जॉय करताना दिसत आहे. या जोडप्यानं त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या मुलींचे सुंदर फोटो शेअर केला आहेत.

Rubina And Abhinav
रुबीना आणि अभिनव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 10:48 AM IST

मुंबई Rubina And Abhinav : अभिनेत्री रुबीना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला आजकाल त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा एन्जॉय करत आहेत. हे जोडपे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जुळ्या मुलींचे पालक झाले आहेत. रुबिना आणि अभिनव यांनी त्यांच्या मुलींची नावं जीवा आणि एधा ठेवली आहेत. या जोडप्याचे गोंडस बाळ तीन महिन्यांचे झाले आहेत. दरम्यान या जोडप्यानं मुलींबरोबरचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. रुबिना आणि अभिनवनं समुद्राच्या किनाऱ्यावरुन आपल्या मुलींचा हातात धरलेले फोटो शेअर केले आहेत. फोटोत या जोडप्यांनी आपल्या मुलींचे चेहरे उघड केलेले नाहीत.

अभिनव-रुबिना जुळ्या मुलींचे पालक : अभिनवननं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''तीन महिन्यांच्या बाळांना शुभेच्छा!'' अलीकडेच या जोडप्यानं लोणावळ्यात त्यांच्या नवजात मुलींबरोबर क्वालिटी टाइम घालवला आहे. त्यांनी याठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी तीन महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांचे स्वागत केले होते. ही बातमी रुबिनाची जिम ट्रेनरनं सर्वप्रथम दिली होती. यानंतर अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. रुबीना तिच्या गरोदरपणात सोशल मीडिया हँडल्सवर खूप सक्रिय होती आणि तिच्या आयुष्यातील अपडेट्स नियमितपणे ती शेअर करत होती.

रुबीना दिलैक वर्क फ्रंट : रुबीना वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती झी टीव्हीवरील 'छोटी बहू' या शोमध्ये दिसली होती. या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. तिचा अभिनय अनेकांना आवडला होता. याशिवाय ती 'शक्ती', 'बिग बॉस 14',' झलक दिखला जा 10' आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 12' मध्ये देखील दिसली आहे. दुसरीकडं अभिनव 'जर्सी नंबर टेन'मध्ये सर्वप्रथम दिसला होता. यानंतर तो 'जाने क्या बात हुई', 'छोटी बहू', 'हिटलर दीदी', 'सिलसिला बदलते रिश्तों का', 'बिग बॉस 14', 'खतरों के खिलाडी 11' आणि 'दिया और बाती हम' अशा अनेक शोमध्ये दिसला आहे. दरम्यान रुबीना आणि अभिनवच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर या जोडप्यानं 21 जून 2018 रोजी शिमला येथे लग्न केलं होतं.

हेही वाचा :

  1. ट्रेलर रिलीजपूर्वी नव्या पोस्टरसह सिद्धार्थने वाढवली 'योद्धा'ची उत्सुकता
  2. रजनीकांत आणि साजिद नाडियादवाला एका अविस्मरणीय चित्रपट प्रवासासाठी एकत्र
  3. कंगना रणौत लोकसभा 2024 ची निवडणूक लढवणार? जाणून घ्या काय आहे तिचं म्हणणं...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.