ETV Bharat / entertainment

आमिर खान, किरण राव दिल्लीत 'लापता लेडीज'च्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित राहणार

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या अगोदर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम देशभर फिरत आहे. 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीत या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलंय.

Laapataa Ladies
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 11:56 AM IST

नवी दिल्ली - 'लापता लेडीज' आता प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. एक आशयघन चित्रपट घेऊन आमिर खानची पत्नी किरण रावनं याचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आयोजित करण्यात आलंय. 19 फेब्रुवारीला होणाऱ्या या स्क्रीनिंगमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी होणार आहे. निर्माता आमिर खान आणि दिग्दर्शक किरण राव देखील स्क्रिनिंगला हजर राहणार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'लापता लेडीज' ही 2001 मध्ये घडणारी ग्रामीण भारतातील दोन तरुण नववधूंची कथा आहे. त्या रेल्वे प्रवासादरम्यान विभक्त होतात आणि याचा शोध पोलीस अधिकारी किशनकडे येते तेव्हा काय घडतं याची रंजक कथा यात पाहायला मिळणार आहे. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दलची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

अभिनेता स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांनी अलीकडेच आगामी 'लापता लेडीज' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांबद्दल आणि किरण रावच्या दिग्दर्शनाबद्दलचा अनुभव सांगितला. "सर्वात पहिल्यांदा स्क्रिप्टनेच मला खूप आकर्षित केले. पण सुरुवातीपासूनच सांगायचं झालं तर, मी ऑडिशनसाठी फक्त चार पानं वाचली होती, जी मला तयार करून पाठवायची होती. त्यामुळे जी चार पानं लिहिली होती त्याने मला खूप चालना मिळाली. जर चार पानं इतकी चांगली असतील तर संपूर्ण स्क्रिप्ट किती चांगली असेल? असा विचार मी केला. त्यानंतर चित्रपट ज्या प्रकारचा संदेश देतोय ते खूप मोठं आहे. त्यांना घर किंवा लवकर लग्नात न अडकवता मुलींना प्रोत्साहन दिले पाहिजे.” असं स्पर्शने एएनआयला सांगितले.

"यातील आणखी एक मोठा संदेश म्हणजे मी साकारत असलेलं पात्र दीपक देतं. तो माणूस आपल्या भावना व्यक्त करतो. आपण आपल्या भावना अनेकदा दडपून ठेवतो. त्यामुळे या सर्व गोष्टींनी मला खूप पाठबळ मिळालं. शिवाय याचं दिग्दर्शन किरण राव करत होत्या, त्यामुळे याचा भाग का बरं व्हायचा नाही." असं तो पुढे म्हणाला.

" शूटिंगच्या दरम्यान मी किरण राव यांच्या दिग्दर्शनामुळे चांगला अभिनेता बनलो. असंख्य शोध न लागलेल्या भावना बाहेर आल्या. आणखी एका गोष्टीचा मला उल्लेख करावा लागेल की त्यांच्याबरोबर काम केल्यामुळं मी चांगल्या अभिनेत्यापेक्षा चांगला व्यक्ती बनलो. त्यामुळे हे सर्व फायदे मला झालेत."असेही स्पर्श म्हणाला. 'लापता लेडीज' 1 मार्चला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'छावा'च्या शूटिंगमध्ये हात फ्रॅक्चरही होऊन विकी कौशलची जिद्द, म्हणाला "थांबू शकत नाही"
  2. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार
  3. 'वॉर'मधील कार चेस सीक्वेन्ससाठी बॉडी डबल न वापरल्याबद्दल सिद्धार्थ आनंदने केलं हृतिक आणि टायगरचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.