ETV Bharat / entertainment

आमिर खान आणि 'तारे जमीन पर'चा दर्शील सफारी 16 वर्षांनंतर सिनेमासाठी एकत्र - दर्शील सफारी

Aamir Khan and Darsheel Safary reunite : 'तारे जमीन पर' चित्रपटानंतर 16 वर्षांनी याचा सीक्वेल बनत असून यामध्ये पुन्हा एकदा दर्शील सफारी आणि आमिर खान एकत्र येणार आहेत. अलिकडेच दर्शीलने एक पोस्ट शेअर करुन याचे संकेत दिले आहेत.

Aamir Khan, Darsheel Safary
आमिर खान आणि दर्शील सफारी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 11:01 AM IST

मुंबई - Aamir Khan and Darsheel Safary reunite : 'तारे जमीन पर' हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला होता. डिसलेक्सिया या दृष्टीदोषामुळे मुलांची होणारी घुसमट या चित्रपटात आपण पाहिली होती. कित्येक प्रेक्षकांनी अतिशय पाणावलेल्या डोळ्यांनी त्यातील इशान या मुलांची गोष्ट अनुभवली होती. विशेष म्हणजे अमोल गुप्तच्या साथीनं आमिर खानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 16 वर्षापूर्वी आलेल्या या चित्रपटात छोट्या इशानची भूमिका दर्शील सफारी या बालकलाकारानं साकारली होती. आता 'तारे जमीन पर' मध्ये सहकलाकार असलेले अभिनेता आमिर खान आणि दर्शील सफारी 16 वर्षांनंतर एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत.

सोमवारी दर्शील सफारीने त्याच्या इंस्टाग्रामवर आमिर खान बरोबरचा त्याचा फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. कोलाजमध्ये त्याने 'तेव्हा आणि आता' असे दोन फोटो शेअर केलेत. यातील एक फोटो आहे तारे जमीनपरमधील तर दुसऱ्या फोटो दर्शील आमिर खानच्या बरोबर फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. या रहस्यावरील पडदा चार दिवसांनी उघडणार असल्याचे संकेतही त्यानं दिले आहेत.

त्याने लिहिलंय, "BOOOMMMMM. 16 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. भावनिक? होय, थोडासा झालो आहे. पुन्हा चार्ज झालोय का असे विचारत असाल तप अगदी बरोबर आहे. माझ्ये मार्गददर्शकाला या अनुभव देण्यासाठी खूप सारे प्रेम. याच जागेवर एका मोठ्या गोष्टीची घोेषणा केली जाणारा आहे ती पाहा. फक्त 4 दिवस उरले आहेत."

'तारे जमीन पर'चा सिक्वेल असलेल्या 'सीतारे जमीन पर' चित्रपटात दर्शील पुन्हा एकदा झळकणार असल्याचे संकेत या पोस्टमधून मिळत आहेत. काही चाहत्यांनी असे गृहीत धरले होते की दोघांनी एका जाहिरातीसाठी सहकार्य केले असावे. दर्शीलने शेअर केलेल्या अपडेटची प्रतीक्षा केली जात आहे.

'तारे जमीन पर' आठ वर्षांच्या हुशार मुलाच्या इशानभोवती फिरतो. आमिरने त्याच्या कला शिक्षकाची भूमिका केली होती. ईशान डिस्लेक्सिक असल्याचे कळल्यानंतर तो त्याची खरी क्षमता शोधतो आणि त्याला मदत करतो.

अलीकडेच आमिरने त्याच्या 'सीतारे जमीन पर' चित्रपटाविषयी काही अपडेट्स शेअर केले. "मुख्य कलाकार म्हणून माझा पुढचा चित्रपट 'सितारा जमीन पर' आहे. या वर्षाच्या अखेरीस नाताळच्या मुहूर्तावर तो प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा एक मनोरंजक चित्रपट आहे, मला कथा आवडली. चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. सुरुवात झाली आहे,” असे आमिरने एका कार्यक्रमात सांगितले होते.

'सीतारे जमीन पर'मध्ये जेनेलिया देशमुख महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मिती आघाडीवर, आमिर खान आगामी राजकुमार संतोषी यांच्या 'लाहोर 1947' मध्ये निर्माता म्हणून काम करेल. यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा -

  1. रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
  2. नाडियादवाला ग्रँडसनच्या वर्दा नाडियादवालाशी तेजस्विनी पंडितची मराठी चित्रपटासाठी हातमिळवणी
  3. जान्हवी कपूरचा 'ओजी मिस्टर अँड मिसेस माही'सह फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.