मुंबई - दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. आता टाटा त्यांच्या निधनावर बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान राजकारण्यांसोबतच बॉलिवूड अभिनेता आमिर खाननेही रतन टाटा यांचे अंतिम दर्शन घेतले. टाटा यांच्या शेवटच्या दर्शनाला आमिर हा त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावबरोबर पोहचला होता. दरम्यान अमिताभ बच्चन, रजनीकांत, राम चरण, नागार्जुन, सलमान खान, रणवीर सिंग, अजय देवगण, रोहित शेट्टी, संजय दत्त, वरुण धवन, सामंथा, राशी खन्ना, पूजा हेगडे, सारा अली खान, प्रियांका चोप्रा या स्टार्सनी रतन टाटा यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली.
एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा : उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र त्यांनी बुधवारी जगातून निरोप घेतला. दरम्यान संध्याकाळी स्मशानभूमीत रतन टाटा याचे पार्थिव पंचतत्त्वात विलीन होणार आहे. टाटा यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र आणि झारखंड सरकारनं एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, राज्यातील सर्व मनोरंजन आणि उत्सवाचे कार्यक्रम रद्द राहतील. रतन टाटा यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वर्कफ्रंट : दरम्यान आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच त्याची निर्मिती आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा ऑस्करसाठी गेला आहे. याशिवाय तो शेवटी करीना कपूरबरोबर 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'सितारे जमीन पर' यांचा समावेश आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर जेनेलिया डिसूझा दिसणार आहे, याशिवाय तो सनी देओल स्टारर 'लाहोर 1947' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.
हेही वाचा :