ETV Bharat / entertainment

एआर रहमान यांनी पूर्ण केला 'रायन'चा बॅकग्राऊंड स्कोअर, धनुषनं शेअर केली पोस्ट - AR Rahman

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 2:49 PM IST

AR Rahman Completes Background Score : अभिनेता धनुषनं त्याच्या आगामी 'रायन' चित्रपटाची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये एआर रहमान चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोअरवर काम करताना दिसत आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत पूर्ण झाल्याची माहिती धनुषनं चाहत्यांना दिली आहे.

AR Rahman Completes Background ScoreAR Rahman Completes Background Score
'रायन'चा बॅकग्राऊंड स्कोअर ((Photo: X/Dhanush))

मुंबई - AR Rahman Completes Background Score : 'रायन' हा बहुप्रतिक्षित चित्रपट रुपेरी पडद्यावर आणण्याची तयारी करत असलेल्या अभिनेता धनुषनं सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाची झलक शेअर करून उत्साह वाढवला आहे. अलीकडील सोशल मीडिया पोस्टमध्ये, धनुषनं त्याच्या चाहत्यांना चित्रपटाच्या बॅकग्राउंड स्कोअरच्या निर्मिती पाहण्याची संधी दिली. हे पार्श्वसंगीत ऑस्कर विजेता संगीतकार एआर रहमान यांनी तयार केलं आहे.

धनुषनं त्याच्या X हँडलवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात रहमान त्यांच्या स्टुडिओत बसलेले दिसतात. चित्रपटातील धनुषचं पात्र बॅकग्राउंडमध्ये संगणकाच्या स्क्रीनवर झळकलेलं दिसत असून रहमान लक्षपूर्वक काम करत आहेत. फोटो शेअर करताना अभिनेता धनुषनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "रायन बॅकग्राउंड स्कोअर पूर्ण झाला. एक वादळ येत आहे." हे अपडेट चित्रपटाचं दुसरं गाणं 'वॉटर पॉकेट' रिलीज झाल्यानंतर आलं आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल होणार असल्याच्या चर्चेंना उधाण आलं आहे. सुरुवातीला हा चित्रपट 13 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, लेटेस्ट बातम्यानुसार याचं रिलीज पुन्हा 26 जुलैपर्यंत पुढं ढकललं जाणार आहे. असं असलं तरी अद्याप यावर निर्मात्यांनी काहीही भाष्य केलेलं नाही. धनुष व्यतिरिक्त, 'रायन' चित्रपटामध्ये कालिदास जयराम, संदीप किशन, एसजे सूर्या आणि अपर्णा बालमुरली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'रायन' हा धनुषच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. हा त्याचा ५० वा चित्रपट आहे आणि दिग्दर्शक म्हणून त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. रश्मिका मंदान्ना आणि नागार्जुन सह-कलाकार असलेल्या या चित्रपटाशिवाय धनुषच्या हातामध्ये शेखर कममुलाच्या 'कुबेर' चित्रपटासह अनेक प्रोजेक्ट आहेत. 'रायन'सह, धनुष प्रेक्षकांना रोमांचकारी दुनियेचा प्रवास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून त्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत.

हेही वाचा -

  1. "ऑल आय ऑन रफाह" चळवळीसाठी प्रियांका, रश्मिका ते कीर्तीपर्यंत भारतीय सेलिब्रिटींनी उठवला आवाज - All Eyes On Rafah
  2. 'पुष्पा 2'च्या दुसऱ्या गाण्यानं 'याड' लावलं, अल्लु अर्जुन आणि मंदान्नाच्या डान्स स्टेप्सची प्रेक्षकांना भुरळ - Pushpa 2 Angaaron Lyrical Video
  3. 'मिस्टर आणि मिसेस माही' स्क्रिनिंगमध्ये लव्हबर्ड्स खुशी कपूर-वेदांग रैनानं वेधलं लक्ष - Mr and Mrs Mahi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.