मुंबई - भारतात खूप कमी दिग्दर्शक असे आहेत की, ज्यांनी बनवलेला प्रत्येक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. पण दिग्दर्शन करण्याचा निर्णय त्यांनी ऐनवेळा घेतला होता. खरंतर राजू हिराणीला अभीिनयात इंटरेस्ट होता. म्हणून त्यानं पुण्याच्या टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये हिरो होण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र, शिकताना त्यांचा इरादा बदलला. त्यांनी कोर्स बदलला आणि दिग्दर्शनात प्रवेश घेतला आणि त्याचा हा निर्णय किती परफेक्ट होता याचा प्रत्यय त्याचे सिनेमे पाहताना सतत येतो.
राजकुमार हिराणीनं आपल्या 20 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत फक्त 6 चित्रपट केले आहेत आणि हे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत. त्यांच्या कमाईच्या आकड्यांवर एक नजर टाकली तरी हे आपल्या लक्षात येऊन जाईल.
राजकुमार हिराणीचे सहा हिट चित्रपट
संजू - रिलीज वर्ष - 2018
- ओपनिंग डे - 34.75 कोटी
- देशांतर्गत कलेक्शन -342 कोटी
- बॉक्स ऑफिस कलेक्शन - 586 कोटी
पीके - रिलीज वर्ष- 2014
- ओपनिंग डे - 26.63 कोटी
- देशांतर्गत कलेक्शन - 340 कोटी
- बॉक्स ऑफिस कलेक्शन - 772 कोटी
3 इडियट्स - रिलीज वर्ष - 2009
- ओपनिंग डे - 12 कोटी
- देशांतर्गत कलेक्शन - 202.95 कोटी
- बॉक्स ऑफिस कलेक्शन - 400.61 कोटी
लगे रहो मुन्ना भाई - रिलीज वर्ष - 2006
- ओपनिंग डे - 3.38 कोटी
- देशांतर्गत कलेक्शन - 74.88 कोटी
- बॉक्स ऑफिस कलेक्शन - 127 कोटी
मुन्ना भाई एमबीबीएस - रिलीज वर्ष - 2003
- ओपनिंग डे - 1.06 कोटी
- देशांतर्गत कलेक्शन - 23.13 कोटी
- बॉक्स ऑफिस कलेक्शन - 34.6 कोटी
डंकी - रिलीज वर्ष - २०२३
- ओपनिंग डे - 35 ते 40 कोटी
- बॉक्स ऑफिस कलेक्शन 470 कोटी
राजकुमार हिराणी सलग चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जात नाही. प्रत्येक चित्रपटाच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ तो घेत असतो. परंतु तो जेव्हा त्याचं फायनल प्रॉडक्ट दाखवतो तेव्हा पाहाणारे तोंडात बोट घालतात. त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणा झालेली नसली तरी तो आणि आमिर खान पुन्हा एकत्र येणार असल्याचे काही संकेत मिळाले आहेत. दोघांच्यात जबरदस्त केमेस्ट्री असल्याचे यापूर्वी सिद्ध झालंय. थ्री इडियट्स आणि पीके या दोन्ही चित्रपटातून ही जोडगोळी हिट ठरली होती. त्यांना अखेर एक विषय मिळाला असून याबाबत दोघांचेही एकमत झाले आहे. ही संकल्पना ऐकल्यानंतर आमिर खान भलताच खूश झाल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शक राजकुमार हिराणी पुढील वर्षी या कामाला सुरुवात करु शकतो.
त्यातील दुसरा चित्रपट बायोपिक असल्याचं समजतंय. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजू नंतरचा आगामी चित्रपट हिराणीचा दुसरा बायोपिक असेल. लाला अमरनाथ बायोपिक बनवण्याची हिराणीकडे संकल्पना तयार असल्याचं समजतंय. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण करेल याकडं लक्ष लागून राहणार आहे.