ETV Bharat / entertainment

प्रभासच्या 'कन्नप्पा'मधील इमेज लीकचे मूळ शोधणाऱ्यास 5 लाखाचं बक्षीस, चित्रपट निर्मात्याची घोषणा

'कन्नप्पा' चित्रपटातील प्रभासची लीक झालेली इमेज फॉरवर्ड न करण्याचं आवाहन निर्मात्यांनी केलंय. इमेज लीकचे मूळ शोधण्यासाठी मदत करण्याला 5 लाखाचं बक्षीस निर्मात्यांनी जाहीर केलंय.

Prabhas Kannappa poster
'कन्नप्पा' पोस्टर (photo Kannappa poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 9, 2024, 5:11 PM IST

मुंबई - तेलुगू सुपरस्टार प्रभास आगामी 'कन्नप्पा 'या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी व्हिएफएक्स तंत्रज्ञांची मोठी टीम कार्यरत आहे. प्रभासला एका अनोख्या रुपात पडद्यावर सादर करण्यासाठी निर्मात्याच्यावतीने खूप मेहनत घेतली जात आहे. असं असताना या चित्रपटातील अभिनेता प्रभासचा एक फोटो लीक झाला आहे. सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्यासारखा पसरला आहे. यात तो पौराणिक पात्र साकारत आहे. हा फोटो लीक झाल्यामुळं 'कन्नप्पा' चित्रपटाचे निर्माते नाराज झाले आहेत.

'कन्नप्पा' चित्रपटातील प्रभासचा फोटो लीक झाल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना आवाहन करुन हा फोटो शेअर किंवा फॉरवर्ड न करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे आम्ही घेत असलेल्या कष्टावर पाणी फिरत असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच ही इमेज लीक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास मदत करणाऱ्यास 5 लाखाचं बक्षीसही त्यांनी जाहीर केलंय.

कन्नप्पाच्या निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेलं निवेदन पुढील प्रमाणे आहे.

कन्नप्पा टीमकडून सर्वांसाठी तातडीचे आणि मनापासून आवाहन

प्रिय प्रभासचे चाहते आणि समर्थक,

गेल्या आठ वर्षांपासून, आम्ही कन्नप्पामध्ये आमचे हृदय आणि आत्मा ओतला आहे. दोन वर्षांच्या इंटेन्स निर्मितीनंतर, आमची टीम तुमच्यासाठी अतुलनीय दर्जेदार आणि उत्कृष्ट चित्रपट आणण्यासाठी समर्पितपणे काम करत आहे. अत्यंत दुःखाने सांगायचं तर आम्हाला अलीकडेच असे आढळून आले की चित्रपटाचं काम सुरु असतानची एक इमेज चोरीला गेली आहे आणि अनधिकृतपणे लीक झाली आहे.

ही कृती केवळ आमच्या मेहनतीलाच कमी करत नाही तर 2,000 हून अधिक VFX कलाकारांसह या प्रोजेक्टसाठी न थकता काम करणाऱ्या हजारो लोकांना प्रभावित करते.

ही इमेज लीक कशी झाली हे उघड करण्यासाठी आणि या लीकसाठी जबाबदार असलेल्यांना पकडण्यासाठी पोलिस तक्रार दाखल करण्याच्या पर्यायांचा मार्ग आम्ही अवलंबणार आहोत.

यानिमित्ताने आम्ही तुमच्याकडे एक निष्टावंत चाहते म्हणून संपर्क करत आहोत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की ही लीक झालेली इमेज /फुटेज शेअर करू नका कारण असे करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईसाठी जबाबदार असेल. या लीकचे मूळ शोधण्यात आम्हाला मदत करणाऱ्यास 5,00,000 चे बक्षीस दिले जाईल. कृपया याबाबतची काही माहिती आम्हाला आमच्या अधिकृत 24 फ्रेम्स फॅक्टरी ट्विटर खात्यावर थेट पाठवा.

हा प्रेम आणि समर्पणाने आकाराला येत असलेला प्रोजेक्ट आहे. आम्ही मनापासून कन्नप्पाची अखंडता जपण्यासाठी तुमच्याकडे मदतीची विनंती करत आहोत. या चित्रपटाच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी आमच्या पाठीशी उभे रहा.

कृतज्ञतेसह, कन्नप्पा टीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.