मुंबई - International Emmy Awards 2024 : अभिनेता अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या लोकप्रिय वेब सीरीज 'द नाईट मॅनेजर' ला 2024 च्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळालं आहे. 'द नाईट मॅनेजर'ला सर्वोत्कृष्ट वेब सीरीजच्या श्रेणीसाठी नामांकन मिळालं आहे. ही बातमी अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी देखील विशेष आहे. दरम्यान याबाबत अभिनेता अनिल कपूरची प्रतिक्रिया समोर आली आहे. पीआर टीमद्वारा शेअर केलेल्या निवेदनात अनिल कपूर म्हटलं, ''मला नुकतेच कळले आहे की, 'द नाईट मॅनेजर'च्या भारतीय आवृत्तीला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं आहे. मला आठवतं की जेव्हा या सीरीजची ऑफर आली, तेव्हा मी गोंधळलो होतो.''
अनिल कपूरनं व्यक्त केल्या भावना : अनिल कपूरने पुढे सांगितलं, "मला एक गुंतागुंतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, पण दुसरीकडे ह्यू लॉरीनं अतिशय सुंदरपणे साकारलेल्या व्यक्तिरेखेत काहीतरी नवीन आणि सत्यता जोडण्याची मोठी जबाबदारीही माझ्यावर आली. एमी अवॉर्ड्समधून आम्हाला मिळालेल्या यशाव्यतिरिक्त, जगभरातील चाहत्यांकडून आम्हाला मिळालेलं प्रचंड प्रेम आठवण करून देईल की, कठोर परिश्रम नेहमीच फळ देतात. मी नेहमीपेक्षा जास्त उत्साही आहे आणि आगामी भूमिकांसाठी उत्सुक आहे." 'द नाईट मॅनेजर'बाबत संदीप मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 19 सप्टेंबरच्या मध्यरात्री, संदीप यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर कृतज्ञता व्यक्त करणारी एक नोट शेअर करत लिहिलं, 'अविश्वास आणि आनंदाचे अश्रू. धन्यवाद टीम. देवाचे आभार.'
'या' वेब सीरीजमध्ये स्पर्धा : 'द नाईट मॅनेजर' हे ब्रिटीश वेब सीरीजचं भारतीय रूपांतर आहे. एमी अवॉर्ड्सच्या नामांकनामध्ये, हा क्राईम थ्रिलर फ्रान्सचा 'लेस गौटेस डे डियू', ऑस्ट्रेलिया के 'द न्यूजरीडर - सीजन 2' आणि अर्जेंटीनाचा 'आईओसी, एल एस्पिया एरेपेंटिडो - सीजन 2' यासारख्या वेब सीरीजशी भिडेल. इंटरनॅशनल अकादमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसनं गुरुवारी 2024 आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा केली, यामध्ये 21 देशांतील 56 स्पर्धक 14 श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत आहेत. भारतीय कॉमेडियन वीर दास 25 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय एमी अवार्ड शो होस्ट करताना दिसेल.
हेही वाचा :