मुंबई : इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (IFFI)च्या आगामी आवृत्तीत प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक शीर्षकासाठी 15 चित्रपट स्पर्धा करणार आहे. या स्पर्धेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. जागतिक आणि भारतीय चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणारा, यातील प्रत्येक चित्रपट मानवी मूल्ये, संस्कृती आणि कथा कथन कलेचा एक अनोखा दृष्टीकोन प्रतिबिंबित करतो. या चित्रपटांमध्ये इराणचा 'फियर एंड ट्रेम्बलिंग' तुर्कीचा 'गुलिजर', फ्रान्सचा 'होली काऊ', स्पेनचा' आई एम नेवेंका', यूएसएचा 'पॅनोप्टिकॉन', सिंगापूरचा 'पियर्स', ट्युनिशियाचा 'रेड पाथ', कॅनडा आणि फ्रान्सचा संयुक्त निर्मिती 'शेफर्ड्स', रोमानियाचे 'द न्यू इयर दॅट नेव्हर केम', लिथुआनियाचा 'टॉक्सिक', चेक रिपब्लिकच 'वेव्स', ट्युनिशिया आणि कॅनडाची संयुक्त निर्मिती 'हू डू आई बिलॉन्ग टू' हे आहेत. याशिवाय भारतून 'द गोट लाइफ','आर्टिकल 370' आणि 'रावसाहेब' यांचा देखील समावेश आहे.
आशुतोष गोवारीकर असणार ज्युरी : यंदाच्या गोल्डन पीकॉक ज्युरीचं नेतृत्व भारतीय चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर करणार आहे. याशिवाय त्याच्याबरोबर सिंगापूरचे दिग्दर्शक अँथनी चेन, स्पॅनिश निर्माते फ्रान बोर्जिया, ब्रिटिश-अमेरिकन निर्माती एलिझाबेथ कार्लसन आणि प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्रपट संपादक जिल बिलकॉक हे देखील सामील असणार आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष),आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) पुरस्कारांसह श्रेणीतील विजेत्यांची निवड ज्युरी करेल. विजेत्या चित्रपटाला महोत्सवातील सर्वोच्च पुरस्काराबरोबर 40 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
या चित्रपटांचा प्रीमियर होईल : या वर्षाच्या यादीमध्ये वेगवेगळ्या थीम आणि शैलींमधील चित्रपटांचा समावेश आहे, हे चित्रपट प्रेक्षकांना वेगळ्या जगात घेऊन जातात. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सौरभ शुक्ला दिग्दर्शित 'जब खुली किताब' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होईल. याशिवाय हृषिकेश गुप्ते दिग्दर्शित 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 55वी आवृत्ती गोव्यात 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. हा सोहळा खूप भव्य असणार आहे.