ETV Bharat / entertainment

लोकसभा निवडणूक लढवणारे 12 सेलेब्रिटी, जाणून घ्या कोण जिंकलं आणि कोण हरलं? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Celebrities contesting elections : लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणी अंतिम टप्प्यात सुरू आहे आणि आता अनेक तारे विजयी झाले आहेत तर काही पराभवाच्या छायेत आहेत. चला जाणून घेऊया कोण जिंकले आणि कोण हरले?

12 Celebrities Who Contested Lok Sabha Elections
लोकसभा निवडणूक लढवणारे 12 सेलेब्रिटी ((IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 5:58 PM IST

मुंबई - Celebrities contesting elections : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास आले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 10 हून अधिक चित्रपटसृष्टींनी आपलं नशीब आजमावले होतं आणि त्यापैकी काही उमेदवार जिंकले आहेत तर काहींच्यावर हरण्याच्या नामुष्की ओढवली आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं पदार्पणाची लोकसभा निवडणूक जिंकली आहे. कंगना रणौतने मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि मोठ्या फरकानं ती विजयी झाली. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंग यांचा तिनं परावभव केला आहे.

अरुण गोविलची आघाडी

रामायण मालिकेत प्रभू रामाच्या भूमिकेमुळे चर्चेत राहिलेले अभिनेता अरुण गोविल यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वतीनं निवडणूक लढवली होती. त्यांना 542075 मत मिळाली असून समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुनिता वर्मा यांच्यापेक्षा त्यांनी 9679 मतांची आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये या सेलेब्रिटींचे भवितव्य ठरले (निकाल)

  1. कंगना रणौत – मंडी (हिमाचल प्रदेश) – विजयी
  2. अरुण गोविल – मेरठ (उत्तर प्रदेश) – (भाजप) आघाडीवर
  3. रवी किशन - गोरखपूर (उत्तर प्रदेश) - (भाजप) 102297 मतांनी आघाडीवर
  4. मनोज तिवारी-(उत्तर पूर्व दिल्ली)-(भाजप) विजयी
  5. हेमा मालिनी- मथुरा (उत्तर प्रदेश)- (भाजप) विजयी
  6. स्मृती इराणी - अमेठी (उत्तर प्रदेश) - (भाजप) 161266 मतांनी पिछाडीवर आहे.
  7. सयोनी घोष- जादवपूर- पश्चिम बंगाल- (TMC) 1 लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर.
  8. शत्रुघ्न सिन्हा- आसनसोल (पं. बंगाल)-(TMC) 50 हजार मतांनी आघाडीवर आहेत
  9. पवन सिंग- करकट (बिहार)- (अपक्ष) ५८ हजार मतांनी पिछाडीवर
  10. लॉकेट चॅटर्जी - हुगळी (पश्चिम बंगाल) - (भाजप) ३३ हजार मतांनी पिछाडीवर
  11. दिनेश लाल यादव- निरहुआ- आझमगड- (उत्तर प्रदेश)- (भाजप) 90 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.
  12. काजल निषाद - गोरखपूर (यूपी) - (समाजवादी पार्टी) - 102297 मतांनी पिछाडीवर.

हेही वाचा -

अजित पवारांना दे धक्का! बारामतीत सुप्रिया सुळे यांचाच डंका, तब्बल दीड लाखानं नणंद बाई सुनेत्रा पवार यांना हरवलं - Baramati Lok Sabha Results

अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक, दक्षिण मुंबईतून दणदणीत विजय, यामिनी जाधव यांचा तब्बल 54 हजार मतांनी पराभव - South Mumbai Lok sabha Election results

बच्चा अभी बडा हो गया है; निवडणूक निकालावरून रोहित पवार यांचा महायुतीला टोमणा - Lok Sabha Election Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.